कोलकत्ता व मुंबई येथील अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे यांनी उंब्रज पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे. निवेदनात सर्व शाळांना त्यांच्या कर्मचारी वर्गाची, विशेषत: बस चालक, सफाई कामगार, व शिपाई यांची पोलिस स्टेशनमार्फत दरवर्षी चरित्र पडताळणी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सुरक्षा उपाययोजना म्हणून सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्याची व त्याचे पालन न करणार्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, निर्भयापथक सारख्या गाड्यांचे गस्त वाढविणे, विद्यार्थी तक्रारींसाठी विशेष हेल्पलाइन नंबर आणि तक्रार पेटी सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
मनसेच्या मागणीनुसार, उंब्रज पोलिसांनी १५ दिवसांच्या आत सर्व शाळा आणि कॉलेजला योग्य ती नोटीस काढावी व याबाबत त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी अमोल सुभाष कांबळे सातारा जिल्हा सचिव, रणजित कदम कराड उत्तर तालुका अध्यक्ष, विजय वाणी उंब्रज शहर अध्यक्ष,. विजय माने उंब्रज शहर अध्यक्ष मनविसे,उमेश कदम समीर दुधाणे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते