कुकुडवाड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अनिलभाऊ देसाई यांची उपस्थिती
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुकुडवाड (ता. माण)
येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर देवबा घार्गे यांच्या प्रचारासाठी मोठा जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला. या प्रचार कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांनी गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या दौऱ्यात अनिलभाऊ देसाई यांनी मतदारांना महाविकास आघाडीचे उद्दिष्टे आणि विकासाची दृष्टी समजावून सांगितली. त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली की, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रभाकर घार्गे यांना भरघोस मतांनी विजयी करून माण-खटाव मतदारसंघात प्रगतीचा नवा अध्याय लिहावा.
कार्यक्रमादरम्यान, अनिलभाऊ देसाई यांनी प्रभाकर घार्गे यांचे नेतृत्व, त्यांच्या कार्यशैलीबद्दल आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या ध्येयाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी कुकुडवाड मधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांसाठी पाठिंबा व्यक्त केला.
गावकऱ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला वेगळेच बळ मिळाले. प्रचारादरम्यान अनेकांनी घार्गे यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या प्रचाराला चालना मिळाली. यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रभाकर घार्गे यांचे आवाहन
प्रभाकर घार्गे यांनीही आपल्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला आणि माण-खटाव मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले स्पष्ट धोरण सांगितले. त्यांनी ग्रामस्थांना विश्वास दिला की, आपण विजयी झाल्यास मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी कटिबद्ध राहू.




