महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या अध्यक्षपदी अनिल माने! शिवाजीराव खांडेकर सहकार्यवाहक
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड ( संपादक : अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर(प्रतिनिधी )
कुकुडवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळाच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे अनिल माने,तर सहकार्यवाहक पदी पुण्याचे शिवाजीराव खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ हे राज्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनेक प्रश्न घेऊन पाठपुरावा करत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकेतर सेवकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी अध्यक्ष अनिल माने व सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर यांनी प्रयत्न केले आहेत, म्हणून त्याची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडी नंतर बोलताना अध्यक्ष अनिल माने सर म्हणाले की महामंडळाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यायावर कुणी अन्याय करत असेल तर सहन केला जाणार नाही. कुणावर सौस्था, शाळा, किंवा शासकीय अधिकारी कुणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल त्यांनी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, सातव्या वेतन आयोगातील १०,२०,३०, योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत व वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्यवाहक खांडेकर सर व आम्ही शासन दरबारात पाठपुरावा करीत आहे, आतापर्यंत आपण सर्वांनी खंबीर साथ दिली आहे. यापुढे आपण सर्वजण अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसन्न कोठूळकर व रमेश इंगवले यांनी काम पहिले,महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर महामंडळाच्या जिल्हा व तालुका पधादिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनिल माने सर व शिवाजीराव खांडेकर सर यांचे अभिनंदन केले आहे.