माण तालुक्याचे युवक नेते सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अनिल भाऊ देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 202४ रोजी जिल्हा परिषद कुकुडवाड गटाचे युवक नेतृत्व महेंद्र भैय्या देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र भैय्या देसाई मित्र समूहातर्फे यात्रा पटांगण म्हसवड येथे भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख एक हजार द्वितीय बक्षीस 61 हजार तृतीय बक्षीस 41000 चतुर्थ बक्षीस पंचवीस हजार तर मॅन ऑफ द सिरीज विजेत्या खेळाडूला सायकल भेट बेस्ट बॅट्समन ला क्रिकेट बॅट भेट ,बेस्ट बॉलर साठी शूज अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. हे सर्व सामने युट्युब वर प्रसारित होणार आहेत सामने हे गाव वाईज पद्धतीने खेळवले जातील .प्रथम 32 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. सामने ग्रामीण वाईज नगरपंचायत तालुका वाईज पद्धतीने खेळवले जातील .सदरचे सामने हे ग्रामीण दोन हाफ शहरी एक हाफ तालुका एक हाफ असे असतील. क्रिकेट संघाची नोंदणी ही युवा नेते अविनाश मासाळ सागर सरतापे सुहास कोके रोहित लिंगे कोच वासू सोनवणे ऋषिकेश लोखंडे बापू वाघमारे हर्षद भिवरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली.