समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
सुशील यादव
म्हसळा :प्रतिनिधी
देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत तसतसा राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार सभा व बैठकांचा जोर वाढला आहे.तिसऱ्या टप्प्यातील ७ मे रोजी पार पडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या ३२ रायगड लोकसभा निवडणुकीत सेना,भाजप युती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उमेदवार आहेत तर त्यांचे विरूद्ध इंडी आघाडीचे उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.
अटीतटीच्या लढतीत आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.दिनांक ३१ मार्च रोजी श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा,तळा आणि श्रीवर्धन मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा तालुकानिहाय निर्धार मेळावा मुंबई दादर येथील श्री कृष्ण सभागृहात पार पडला.