देवराई गणेश मंडळाचा उपक्रम वाखान रोड येथे भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते,
कराड प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री देवराई गणेश मंडळ, वाखान रोड, मंगळवार पेठ, कराड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला स्थानिक नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग मिळाला.

शिबिराचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. रक्तदात्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे भावी काळात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासणार नाही, असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात मंडळाचे कार्यकर्ते संदीप वाघमारे सर, अभयसिंह जाधव, ऋषीकेश सोनवले, पृथ्वीराज मोहिते, राहुल पालकर, मंगेश ढेरे, सुरेश पाटील, श्रेयश कुरकुले, अविनाश भोसले, आर्यन पालकर, तुषार वगैरे, अक्षय पाटील, अशोक यादव, रोहन पाटील, नागेश दोडमणी, दत्तात्रय ढेरे, जितेंद्र पाटोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *