म्हसवड: अहिंसा पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात नव्याने तलाठी पदी नियुक्त झालेल्या यश ढोले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशासकीय सेवेतून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्याचे आवाहन केले.
तलाठी हा शासन आणि सामान्य नागरिक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगून, त्यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या हिताचे कार्य करण्याचे आवाहन पिसे यांनी केले. कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांनी यश ढोले यांना प्रशासनातील सर्वोच्च पदे प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी अहिंसा पतसंस्थेच्या कार्याची प्रशंसा करताना नितिन भाई दोशी यांचा उल्लेख केला, जे सदैव यशस्वी घटकांचा गौरव करण्यात पुढे असतात असे मत व्यक्त केले.
अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन आणि म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी यश ढोले यांच्या नियुक्तीवर अभिमान व्यक्त करत तलाठी पदावर कार्यरत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना यश ढोले यांनी नितिन काकांच्या प्रेरणेतून तलाठी पद मिळविण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.
या समारंभात संस्थेचे संचालक अनिल गाडे, माजी नगरसेवक संग्राम शेटे, विनोद रसाळ, चेतन ढवन, शिवाजीराव जाधव, अजीम तांबोळी, सुरज करमाळकर, ऋषिकेश देशमुख, तुषार शेंडगे, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय धट यांनी मानले.
**चौकट**: *अहिंसा पतसंस्था फक्त कर्जच नव्हे तर प्रेमही वाटते – आण्णासाहेब टाकणे*