पोलिस उपनिरीक्षक पदी महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक मिळवून अमोल घुटुकडे यांनी माण देशाचे डंका संपूर्ण राज्यात केला. महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून खऱ्या अर्थाने अमोल घुटुकडे यांनी जी कामगिरी केली. ती आम्हा माण वासियांसाठी नक्कीच गौरवास्पद आहे असे विधान अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी व्यक्त केले. Bमहाराष्ट्र राज्यसेवेचा निकाल नुकताच लागला , आणि या परीक्षेमध्ये माण तालुक्यातील दीडवाघवाडी येथील अमोल घुटुकडे यांनी राज्यात पाहिला येण्याचा मान मिळवला आणि माण चा माण खऱ्या अर्थाने वाढला. याचे औचित्य साधून माण तालुक्यातील नामांकित असलेल्या अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. म्हसवड यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी बोलताना नितिन दोशी म्हणाले की, माण तालुका हा पाण्यामुळे दुष्काळी नक्कीच असेल पण या तालुक्यात अधिकाऱ्यांचा मात्र पूर पाहायला मिळतो. ज्ञानाचा महापूर पाहायला भेटतो. आणि अशा या दुष्काळी शेतकऱ्याच्या घरातच अधिकारी जन्माला येतात. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रशासकीय सेवेत राहून गोरगरीब लोकांची सेवा करावी त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली.
Bbया कार्यक्रम प्रसंगी मा.अमोल घुटुकडे, जलसंपदा विभागात मोजणीदार पदी औरंगाबाद येथे निवड झालेल्या कु. पूजा भागवत व मंडल अधिकारी पदी नेमणूक झालेले किशोर वाघमोडे या तिघांनीही महाराष्ट्र राज्य सेवेतून वेगवेगळ्या पदावर यश मिळवले बद्दल तिघांचा ही सत्कार घेण्यात आला होता.सर्वप्रथम सत्कार मूर्तींना शाल व भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की घुटुकडे, भागवत व वाघमोडे यांनी मिळवलेलं यश नक्कीच अभिमानस्पद आहे . व एवढ्या यशावर न थांबता भविष्यात जास्तीत जास्त संघर्ष करून आणखी मोठ्या पदावर विरजमान व्हावं. पुढे ज्ञानवर्धिनी हायस्कुलचे प्राचार्य, मासाळ सर जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.झालेल्या सत्काराचे उत्तर देताना राज्यात अव्वल क्रमांक मिळवनारे घुटुकडे भावुक झाले. व नितिन दोशी सरांसारखी लोक या भागात आहेत म्हणून आम्हाला प्रेरणा मिळते व आणखी यश मिळवण्यासाठी प्रेरणा भेटते असे ते बोलले. पूजा भागवत सत्काराला उत्तर देताना बोलली की, लहान पनापासून मी नितिन काकाना ओळखते, ते मनमिळावू आहेत व एखाद्याने यश मिळवल्यानंतर त्यांचे आदरतिथ्य करणारे त्याचा माणसन्मान करणारे फार कमी लोक आहेत आणि त्यापैकी एक नितिन काका आहेत. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक महावीर व्होरा आणि कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार् हरिदास मासाळ यांनी मानले