म्हसवड नगरपरिषद, दहीवडी नगरपंचायतीसाठी दहा कोटींचा निधी # * आ. जयकुमार गोरे यांची माहिती *

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक :अहमद मुल्ला) 

म्हसवड
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत दहीवडी नगरपंचायतीसाठी ४ कोटी ७० लाख आणि म्हसवड नगरपरिषदेसाठी ५ कोटी ३० लाख असा एकूण दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन्ही शहरात विविध विकासकामे मार्गी लागली असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्यशासनाचा असणाऱ्या योजनेतून म्हसवड नगरपरिषदेसाठी प्राप्त झालेल्या ५ कोटी ३० लाखांच्या निधीतून म्हसवड पुळकोटी रस्ता ते मेगासिटी विरकरवाडी ॲप्रोच रस्त्याच्या कामासाठी ५० लाख, म्हसवड हिंगणी ॲप्रोच कलेढोणे वस्ती रस्ता २५ लाख, म्हसवड शिंगणापूर रस्ता ते शिंदे तावसे वस्ती रस्ता ५० लाख, म्हसोबा मंदीर ते सुभानवस्ती शाळा ॲप्रोच पाण्याची टाकी तावसे वस्ती रस्ता २० लाख, म्हसवड माळशिरस रस्ता ॲप्रोच ते कोडलकर वस्ती रस्ता ४० लाख, तावसे खांडेकर वस्ती रोड ते सुभाष तावसे घरापर्यंत रस्ता १५ लाख, नाभिक गल्ली येथे समाज मंदिर २५ लाख, मुस्लिम समाज मंदिर २५ लाख, भगवान गल्ली व्यायम शाळा २० लाख, मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षक भिंत ३५ लाख, मासाळवाडी रस्ता ५० लाख,म्हसवड गंगोती रोड ते रेस्ट हाऊस बंधारा रस्ता ३० लाख, नागोबा रोड ते मसाईवाडी रस्ता ३५ लाख, पवारवस्ती रस्ता ३० लाख, मासाळवाडी ये शेंडगेवाडी रस्ता ३० लाख, नगरपरिषद हद्दीतील चौक सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
दहीवडी नगरपंचायतीसाठी मंजूर निधीतून प्रभाग ९ मधील अंतर्गत रस्ते, गटर आणि सुशोभीकरणासाठी ५० लाख, प्रभाग १५ मधील विकासनगर, समर्थनगरसाठी ५० लाख, प्रभाग सहासाठी ५० लाख, प्रभाग १३ मधील शिंदे नगर येथे महालक्ष्मी सभामंडप व सुशोभीकरणासाठी १५ लाख, प्रभाग ७ मधील गांधीनगर येथील अंतर्गत रस्ते, गटर आणि सुशोभीकरणासाठी ५० लाख, प्रभाग ११ मधील बिदाल रोड कॅनॉलशेजारुन आदर्श शाळेपर्यंत कॉंक्रिट रस्ता १५ लाख, कॅनॉल साकव १५ लाख,जगताप ते देवकर घर डांबरीकरण १५ लाख, बंदीस्त गटर १० लाख, प्रभाग ५ मधील सिध्दनाथ व्यायाम शाळा ५० लाख, प्रभाग १३ मधील प्रियदर्शनी डेअरी रस्ता १० लाख, प्रभाग ३ मधील महालक्ष्मी मंदीरानजीक सामाजिक सभागृह १० लाख, प्रभाग २ मधील सेवालाल नगर सामाजिक सभागृह १० लाख, प्रभाग १७ मधील मोरेमळा ते साळुंखे वस्ती रस्ता एक कोटी, कॅनॉल साकवसाठी २० लाख असा एकूण चार कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर झाला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!