मासाळवाडीतील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा; नूतन इमारतीचे उद्घाटन उत्साहात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड….प्रतिनिधी

मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण विभागाचे उपसंचालक सचिन धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कौशल्याधारित शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. “पद, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा समाजातील गरीब घटकांना सक्षम बनवणे हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत संस्थेने गेल्या १२ वर्षांत डीएमएलटी व रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांतून सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक विकास साधला आहे.

माजी नगराध्यक्ष नितीन (भाऊ) दोशी यांनी सांगितले की, कोणत्याही शासकीय निधीशिवाय नागरिक, डॉक्टर आणि संस्थेच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली ही नूतन इमारत विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. भविष्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अधिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनीही संस्थेचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले. तसेच संस्थेसाठी दोन संगणक देण्याची घोषणा त्यांनी केली.

संस्थाध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत, आगामी काळात डिजिटल पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, डॉ. जयदेव काळेल, प्राचार्य डी. वाय. ओंबासे, डॉ. सतीश मासाळ, डॉ. कारंडे मॅडम, नारायण मासाळ, लोखंडे सर, सचिन विरकर, डॉ. रुपनवर, प्राचार्य सविता मासाळ, उपप्राचार्य श्रद्धा करमाळकर, प्रा. संतोष बगाडे, काटकर मॅडम, रावसाहेब मासाळ, कृष्णदेव मदने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मासाळवाडी येथील कु. कोमल तुकाराम रुपणवर हिची केवळ १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. संतोष बगाडे यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *