सर्व श्रेष्ठदान … देहदान जनजागृती प्रबोधन चर्चासत्र कराड येथे संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते कराड

नुकतेच दत्त चौक, कराड येथे *कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे ” देहदान – समज गैरसमज “*या विषयावर प्रबोधन करण्यात आले .

रविवार दि. २९मार्च २०२६ रोजी कै. प्रभावती खटावकर यांनी मृत्यूपश्चात देहदान केले होते . त्या अनुषंगाने त्यांच्या उत्तरकार्य प्रसंगी त्यांचे निवासस्थान असलेल्या दत्त चौक, कराड येथे दि. ११/०४/२०२६ रोजी उपस्थिताना हे प्रबोधन करण्यात आले.
    कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील अनोटॉमी विषय तज्ञ डॉ. डी. टी. वाघ , डॉ. चेतन पवार आणि श्री स्वप्निल पाटील यांनी देहदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. या विषयीच्या समाजात असलेल्या बऱ्याच शंकांचे योग्य निरसन करण्यात आले.याप्रसंगी इच्छुकांना देहदानाचे फॉर्म वितरित करण्यात आले.
      याविषयी डॉ वाघ माहिती देताना म्हणाले …देहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे की ज्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची शिक्षणाची सुरुवातच ही शरिरशास्त्र या विषयापासून होते . याच देहदान केलेल्या शरीराला म्हणजे शास्त्रीय भाषेत कॅडेवरना नमन करूनच शिक्षणाची सुरुवात केली जाते .
       देहदान केल्यानंतर संबंधित संस्थेकडून या कॅडेवर चे कोणतेही अवयव काढले जात नाहीत . चिरफाड केली जात नाही .अथवा विटंबना केली जात नाही . याचा अगदी सन्मानपूर्वक ,आदरपूर्वक अभ्यास केला जातो .दरवर्षी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात २५० विद्यार्थी नव्याने प्रवेश घेत असतात त्यांच्यासाठी वर्षाला किमान १५ कॅडेवर ची आवश्यकता असते . त्याप्रमाणात हे कॅडेवर उपलब्ध होत नसल्याने देहदान या विषयावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले . देहदान आणि अवयवदान हे दोन्हीही भिन्न प्रकार आहेत हे स्पष्ट केले .

     यावेळी डॉ चेतन पवार यांनी आपल्या संस्कृतीनुसार अगदी ऋषी काळापासून शिक्षणासाठी देहदान कसे केले जात होते ? देहदान झाल्यानंतर त्या कॅडेवर चा पुढील अभासात्मक प्रवास कसा होतो ? संबंधित कॅडेवर कशा प्रकारे डिस्कार्ट केले जाते ? याविषयी सखोल माहिती दिली.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कराडचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव यांनी भूषविले .
यावेळी प्रभावती खटावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत देहदानाचे महत्व पटवून देताना असे देहदान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले .
प्रमुख उपस्थिती :- यावेळी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ .श्री सत्यजीत पवार , डॉ गीता कारंडे , डॉ हर्षा पाटील , डॉ अजय देशमुख , डॉ, दुर्गा देशमुख , डॉ ढगाले , डॉ जयसिंग पवार ,

*नगरसेवक* श्री विजयसिंह यादव , सौ कीर्तिका विभुते , श्री नरेंद्र लिबे , श्री आशुतोष डुबल , माजी नगरसेवक ॲड श्री सतीश पाटील , श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे खजिनदार श्री संजय बदियाणी , , श्री विनायक शास्त्री वरुडकर , श्री नंदकुमार कुलकर्णी (गुरुजी ) ,श्री वसंत शिंदे , खटावकर कुटुंबीयांचे सर्व आप्तेष्ट नातलग , मित्रमंडळ तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या .
डॉ अजय देशमुख यांनीही आपल्या मनोगतात आदरांजली वाहून पूर्वकालीन देहदानाचे महत्व अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले .
कार्यक्रम स्थळी माजी नगरसेवक ॲड. श्री सतीश पाटील यांनीही श्रद्धांजली वाहताना आपले मनोगत व्यक्त करून देहदानाचा फॉर्म भरून उपस्थितांसमोर आदर्श निर्माण केला .
यांच्या सोबतच उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपापला देहदान संबंधी अर्ज भरण्याचा मनोदय व्यक्त केला .
या कार्यक्रमाचे निमित्ताने होत असलेल्या जनजागृतीद्वारे प्रभावती खटावकर यांनी केलेल्या देहदानाचे महत्व अधोरेखित झाले .
समाजातून देहदान करणाऱ्यांची संख्या वाढणे हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री प्रसाद अनगळ यांनी केले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *