म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेपूर्वी सर्व विभागानी येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोई सुविधांची पुर्तता करावी :जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी)-
सिद्धनाथ यात्रेकरीता येणाऱ्या भाविकासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई सविधा मिळाव्यात याकरीता संबधित सर्व विभागांना सुचना देण्यात आल्या असून त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी सहा दिवसात झाली पाहिजे अन्यथा संबधित विभाग प्रमुखाची गय केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेद्र डुडी यांनी सांगीतले
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सव यात्रा १३ डिसेंबर रोजी संपन्न होत असून या यात्रेच्या तयारी निमित्त सर्व विभागांची म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिर सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीत जिल्हाधिकारी जितेद्र डुडी बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख माण चे आमदार जयकुमार गोरे,प्रातांधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे , तहसीलदार विकास अहिरे ,मुख्याधिकारी डॉ .सचिन माने,वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर म्हसवडचे रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने ,जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने , गणपतराव राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, पृथ्विराज राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, विजय धट, विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे , नितीन शेठ दोशी, नगरसेवक युवराज सुर्यवंशी धनाजी माने, कैलास भोरे ,अकिल काझी , शहाजी लोखंडे,युवा नेते करण पोरे, विकास गोंजारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते
यावेळी यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की ‘सदर ची आढावा बैठक म्हणजे असे कोणीही अधिकाऱ्यानी समजु नये की वर्षातुन एकदा होते, प्रश्न विचारतात अन् सोडुन देतात, मी यावेळी प्रत्येक विभागाची जातीने चौकशी करून त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्याची तपासणी करणार आहे या मध्ये जर कोणी कसुर केल्याचे निदर्शनास आल्यास मात्र त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. यात्रेची मुख्य जबाबदारी ही म्हसवड पालिकेची असल्याने पालिकेने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेत यावेळी
पालिकेला आणखी ४०० तात्पुरते कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले,नगरपालिकेने प्रत्येक १ किमी वर मुव्हेबल शौच्छालय लावावे व तेथे सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी यात्रेच्या ठिकाणी १०० सफाई कर्मचारी नेमावे ,पुरशी फायर ब्रिगेड, रुग्णवाहिकाची व्यवस्था करावी
तर आरोग्य विभागाने प्रत्येक १ कि.मी. वर एक रुग्णवाहिका तैनात ठेवावी व पालिका इमारतीशेजारी एक तात्पुरते रुग्णालय उभारावे त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम तैनात ठेवावी, पुरेसा औषधसाठी त्याठिकाणी ठेवावा यासह म्हसवड आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात बेड आरक्षित करून ठेवावेत असे आदेश देत याबाबत जी मदत लागेल ती आपण उपलब्ध करुन देवु असे आश्वासन दिले
सिद्धनाथ मंदिर ट्रस्टने नेमलेल्या स्वयंसेवकाचा ड्रेस कोड असावा तसेच त्या स्वयंसेवकानी भाविकांशी नम्रतेने बोलायच्या सूचना देण्यात याव्या म्हणजे बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांशी वाद होणार नाही तसेच नगरपालिकेने गावात येणाऱ्या चारी रस्त्यावर मंदिर कोठे आहे रथ कोठे आहे याचे फलक लावावे
यावेळी माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी बोलताना एस.टी. विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली, एस.टी. विभागाने मुबलक एस.टी गाड्या. देण्यापेक्षा थोड्याच पण चांगल्या बंद न पडणाऱ्या एस.ट्या प्रवाशांना उपलब्ध करून द्याव्यात, . तर सातारा – पंढरपुर या महामार्गावर माण परिसरात कोठेही सुचना फलक नाहीत, दिशा दर्शक फलक नाहीत, रिप्लेक्टर नाहीत महामार्गाचे काम व्यवस्थित झाले नाही चौकात नव्या प्रकारातील स्पिडब्रेकर नाहीत यामुळेच तालुक्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आणुन देत आजच संबधित महामार्गाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जर पोलिस प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला नाही तर आपण हा प्रश्न येत्या अधिवेशनात विधानसभेत मांडुन पोलीसांवरच गुन्हा दाखल करण्याविषयी प्रश्न मांडणार असल्याचे खडसावले. यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबधितावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तर यात्राकाळात कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही याची ग्वाही दिली.

यावेळी नगरपालिका .आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, पोलीस वाहतूक विभाग, एस टी महामंडळ ,वीजवितरण विभाग ,रस्ते विकास महामंडळ , सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वच्छंता विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपआपल्या कामाच्या केलेल्या तयारीची माहिती दिली
यावेळी बीडीओ. दहिवडी, साबां उप अभियंता धीरज विजापुरे, सहाय्यक अभियंता प्रकाश गायकवाड, शाम ठोंबरे, ग्रामीण पाणीपुरवठा सचीन खताळ, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे, वाहक नियंत्रक कोळी एम. एस. सी. बी. चे उपअभियंता आर. बी. डावरे, आर एम लादे, वसंत भोसले, म्हसवड शहर वीज वितरण कंपनी उपअभियंता, म्हसवड नगरपालिका मुख्य लिपिक म्हसवड शहर नगरपालिका अभियंता चैतन्य देशमाने म्हसवड- महसूल तलाठी यु. डी. आकडमल म्हसवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त गणेश गुरव, हरिभाऊ गुरव, वैभव गुरव, दिलीपराज किर्तने, बुरांडे वकील, पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट –
यंदा माणगंगा नदीपात्र कोरडे ठणठणीत असल्याने श्री.चा रथ हा नदीपात्रातुन नेण्यात यावा ही लोकभावना विचारात घेवुन त्याप्रमाणे पाऊस व पाणी याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितल्याने
*आम.जयकुमार गोरे :
नगरपालिकेने यात्रेकरीता येणाऱ्या व्यापारी व इतर व्यावसाईका कडून अवास्तव पैशाची मागणी करु नये ,यात्रा हे पैसे मिळवण्याचे ठिकाण नाही