सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडावी : रमेश पाटील
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
चाफळ : प्रतिनिधी
दर साल दर वर्षी प्रमाणे अखंड सौभाग्यवती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चाफळ येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येत असतात. सीता माईची यात्रा येत्या १५ जानेवारीला आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन तहसीलदार रमेश पाटील यांनी केले आहे.
तीर्थक्षेत्र चाफळ ता.पाटण सीतामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी जे. एस.वाघ,वितरणाच्या अधिकारी प्रज्ञा जाधव, मंडल अधिकारी प्रकाशराव गाडे, वाहतूक नियंत्रक विजय कांबळे, विस्तार अधिकारी जे. बी. दळवी, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, उपसरपंच सुरेश काटे,विश्वस्त एल.एस.बाबर, पोलीस पाटील सागर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन भोसुरे, तलाठी महेश घोरपडे अमोल पांचाळ, ज्योती कोठुळे,व्यवस्थापक भा.मा सुतार तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


