*सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघ साताऱ्यात काढणार “सैनिक आक्रोश मोर्चा”*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी

      बुधवार दि.7/8/2024 रोजी मा. जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा पोलिस प्रमुख सातारा यांना आजी/माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघ यांचे वतीने निवेदन देणेत आले. आहे

या मध्ये असे म्हंटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अनेक वेळा सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांच्या वतीने सैनिकांच्या समस्या अडचणी विषयी निवेदन देण्यात आली व त्यांच्या समस्या विषय भेटीची वेळ मागण्यात आली परंतु त्यांनी आजतागायत सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक व शहीद जवान कुटुंब यांना भेटीची वेळ दिली नाही व सातारा जिल्ह्याच्या सैनिकांची मीटिंग बोलावली नाही. व सातारा जिल्ह्यामध्ये 26 जुलै कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले परंतु त्या कार्यक्रमासाठी शहीद जवान कुटुंबीयांच्या सन्मान करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर राहिले नाहीत.

या सर्व बाबिमुळे दि.25/8/2024 चे अगोदर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघ यांना भेटीची वेळ द्यावी. तसे न झालेस दि.30/8/2024 रोजी सैनिकांच्या समस्या अडचणी संदर्भात सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी शहीद कर्नल संतोष महाडिक साहेब स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत “सैनिक आक्रोश मोर्चा” काढणार आहोत.
असे निवेदन सर्व माजी सैनिक संघटना व पॅरा मिल्ट्री संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा पोलीस प्रमुख सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्यांना सांगण्यात आले की आपले विभागामार्फत मा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तत्काळ अवगत करावे.

या.प्रसंगी.अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ सातारा, अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा, अध्यक्ष सैनिक समाज पार्टी सातारा, अध्यक्ष जवान किसान पार्टी सातारा, अध्यक्ष प्यारा मिलिटरी संघ सातारा, अध्यक्ष सैनिक समता दल सातारा, असे अनेक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष,पदाधिकारी माजी सैनिक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *