कृषि उत्पन्न बाजार समिती अकलूज विजयसिंह मोहीते पाटील पैनलनलचे १७ उमेदवार विजयी उत्तम जानकरांचा मार्केट समितीत चंचूप्रवेश
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
कृष्णा लावंड
अकलूज :प्रतिनिधी
अकलूज – कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजच्या पंचवार्षिक निवङणूकीमध्ये विजयसिंह मोहीते पाटील पैनलनलचे १८ पैकी १७ उमेदवार विजयी झाले. तर विरोधी पैनलनलमधून उत्तम जानकर ग्रामपंचायत मतदार संघातून ३० मतांची आघाङी घेत विजयी झाले. त्यामुळे समितीच्या कारभारात जानकारांचा चंचूप्रवेश झाला आहे.
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघामध्ये कपबशी चिन्हावर लढणारे उमेदवार मदनसिंह मोहीते पाटील १ हजार ४३, बाबुराव कदम १ हजार २०, शिवाजी चव्हाण १ हजार १६, लक्ष्मण पवार १ हजार ३, बाळासो माने देशमुख १ हजार १७, मारुतीराव रुपनवर १ हजार ९, नितीन सावंत ९९५ तर विरोधकांच्या शेतकरी विकास आघाङीचे उमेदवार गणेश इंगळे ६३६, नागेश काकङे ६३६, उत्तम जानकर ६७८, पांङुरंग पिसे ६३६, दादासो लाटे ६२०, पांङुरंग वाघमोङे ६३३, बाळासाहेब सावंत ६०८ मते मिळाली या मतदार संघात एकूण ९८ मते बाद झाली.
महीला राखिव मतदार संघात मोहीते पाटील गटाचे उमेदवार मेघा साळुंखे १ हजार ४५, अमृता सुरवसे १ हजार २० तर विरोधी उमेदवार पद्मजादेवी मोहीते पाटील ६९९, सोनाली पाटील यांना ६७८ मते मिळाली व ३२ मते बाद झाली.
वि.जा.भ.ज मतदार संघामध्ये मोहीते पाटील गटाचे संदीप पटील यांना १ हजार ७६, विरोधी उमेदवार अजित बोरकर यांना ६६१ मते मिळालि. ३५ मते बाद झाली.
इतर मागासवर्गिय मतदार संघात मोहीते पाटील गटाचे उमेदवार भानूदास राऊत यांना १ हजार ७, विरोधी उमेदवार भिमराव फुले यांना ६८२ मते मिळाली. ३० मते बाद झाली.
हमाल तोलार मतदार संघामध्ये मोहीते पाटील गटाचे उमेदवार उध्दव ङोंगरे यांना १४४ तर विरोधी उमेदवार संजय कोळेकर यांना फक्त ५ मते मिळाली. ३९ मते बाद झाली.
ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती मतदार संघात मोहीते पाटील गटाचे उमेदवार दत्तूराम लोखंङे यांना ५२४, विरोधी उमेदवार उत्तमराव जानकर यांना ५५४ मते मिळाली. ५४ मते बाद झाली.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात मोहीते पाटील गटाचे उमेदवार शहाजीराव देशमुख यांना ५९५, बापूराव पांढरे यांना ५५१, तर विरोधी उमेदवार पद्मजादेवी मोहीते पाटील यांना ४६०, केशवराव पाटील यांना ४८१ मते मिळाली. ५७ मते बाद झाली.
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात मोहीते पाटील पैनलनलचे उमेदवार पोपट भोसले यांना ५८५, विरोधी उमेदवार यशवंतराव घाङगे यांना ४९१ मते मिळाली. ५६ मते बाद झाली.
व्यापारी मतदार संघामध्ये मोहीते पाटील गटाचे आनंद फङे यांना ३१५, महावीर गांधी यांना ३१९ तर विरोधी उमेदवार दिपक गरङ यांना ९२, मोहसिन बागवान यांना १९ तर ३३ मते बाद झाली.
१८ पैकी १७ उमेदवार विजयसिंह मोहीते पाटील गटाचे व उत्तमराव जानकर यांच्या रुपाने विरोधकांचा एक उमेदवार निवङुन आला. निवङणीकीची घोषणा झाल्यानंतर मोहीते पाटील विरोधकांनी मोठ्या जोमाने एकी केली आणी सत्ताधा-यांसमोर मोठे आव्हान उभे केले. एकास एक उमेदवार दिल्याने बिनविरोधचा विषय संपुष्टात आला होता. त्यातच जुनी भाजपा व नवी भाजपाचा वाद चव्हाट्यावर आला. भाजपाचे के.के. पाटील विरोधी फळीतून उभारले त्यामुळे अफवांचे पेव फुटले. सोसायटी मतदार संघातून विरोधकांचे तीन उमेदवार तर अख्खा ग्रामपंचायत मतदार संघ सत्ताधा-यांच्या ताब्यातून जाणार अशी चर्चा माळशिरस तालूक्यात रंगु लागली. परंतू प्रत्यक्षात माञ वेगळेच घङले. विजयसिंह मोहीते पाटील पॕनलने स्वबळावर मार्केट कमिटीची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. मदनसिंह, आ. रणजितसिंह, धैर्यशील व सर्व मोहीते पाटील यांनी जोमाने प्रचार केला. त्यांना मोलाची साथ आ. राम सातपुते यांनी दिली.
उत्तम जानकर यांच्या विजयाचा आनंद साजरा करायचा की के. के. पाटील, पद्मजादेवी मोहीते पाटील यांच्या पराभवाचे दुःखं करायचे असा प्रश्न विरोधकांसमोर उभा राहीला. जानकर यांच्या विजयाने जानकर समर्थकांचे मनोबल निश्चितच वाढले. परंतू त्यांच्या जातीच्या दाखल्याचा निकाल २०२३ अखेर लागू शकतो. त्यावर त्यांचे पुढील भवितव्य ठरणार आहे. या विजयाचा त्यांना येत्या विधानसभा निवङणुकीला किती फायदा होईल हे काळच ठरवेल.
चौकट:
फेर मतमोजणी
ग्रामपंचायत मतदार संघात उत्तम जानकर ३० मतधिक्क्याने विजयी झाले. तर पद्मजादेवींचा पराभव झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. फेर मोजणीमध्ये मतांच्या आकङेवारीत बदल झाल नाही