अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने हळदी कुंकवाचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
श्रीकांत जाधव -प्रतिनिधी

कराड :

  अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ, नवी दिल्ली (भारत सरकार) आणि भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांची भारतीय जनता पक्षात सदस्य नोंदणी करण्यात आली तसेच कायदेविषयक मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन करताना लघु उद्योग आणि व्यवसाय कसे सुरू करावेत यावर चर्चा करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महिला सतर्कता व सुरक्षेच्या उपाययोजनांवरही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात सेवावृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच बचत गटांच्या सीआरपी, महिला सरपंच व उपसरपंचांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला संघाच्या पुणे मंडळाच्या अध्यक्षा व भाजप उत्तर मंडलाध्यक्षा पोलिस मित्र संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षा श्रीमती वनिता सुर्वे, तालुका अध्यक्ष माधुरी थोरवडे, नीलम देशमुख, निरुपमा देशमुख, अंकिता सुर्वे, शरद काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधन देशमुख यांनी केले तर सांगता श्रीमती मीनाक्षी पोळ यांनी राष्ट्रगीताने केली. यावेळी सर्व महिलांना हळदी-कुंकवाचा मान व वाण देऊन सन्मान करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!