व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, :
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ (अभाभंस) सन २०२३-२४ च्या कार्य अहवालाचे प्रकाशन गुरुवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. कित्ते भंडारी सभागृह (कॉन्फरन्स हाॅल) येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पुष्कराज कोले साहेब (जिंदाल उद्योग समूहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, फायनान्स) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास अभाभंस महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर, तसेच विश्वस्त श्रीमती रिटा मिठबावकर, कार्याध्यक्ष श्री. विनोद चव्हाण, मुख्य सचिव श्री. प्रकाश कांबळी, खजिनदार श्री. जगदीश आडविरकर, उपाध्यक्ष श्री. युवराज शिरोडकर, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्य अहवाल तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतलेल्या सहसचिव श्री. संतोष बाबुराव मांजरेकर यांचे या प्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले. अहवालाचे वृतसंकलन, शब्दांकन तसेच आकर्षक मांडणी त्यांनीच केली असून, खजिनदार श्री. जगदीश आडविरकर आणि प्रवक्ते श्री. शशांक पाटकर यांनी त्यांना अहवाल छपाईसाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. गणेश तळेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला, आणि उपस्थित मान्यवरांनी अहवालातील कामगिरीचे कौतुक केले.