रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयात आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते,
उंब्रज (कराड):प्रतिनिधी

कराड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा” उत्साहात पार पडली. विद्यार्थिनींनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध आकर्षक आकाश कंदील तयार करून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.

या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बिद्री कोठीमठ सर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील एस. आर. या होत्या. यावेळी कलाशिक्षक श्री. कुंभार एस. जी., उपशिक्षिका श्रीमती थोरात एम. जे. तसेच गुरुकुल प्रमुख श्री. मिरजगावे के. एम. उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत श्री. मिरजगावे के. एम. यांनी केले. कार्यशाळेत कलाशिक्षक श्री. कुंभार एस. जी. व श्री. बिद्रीकोठीमठ बी. व्ही. यांनी विद्यार्थिनींसाठी विविध प्रकारचे आकाश कंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थिनींनीही उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या हाताने सुंदर, आकर्षक आणि कलात्मक कंदील तयार केले.

या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, संयम आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती थोरात एम. जे. यांनी केले.

विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना नवे बळ आणि प्रोत्साहन मिळाले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *