भामट्यांपासून सावध रहा. आपल्या घरात अनोळखी व्यक्तींना येऊन देऊ नका. सपोनि सोनवणे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
By; Ahmad Mulla
म्हसवड ;
             सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील यांना कळविण्यात येते की , वडूज , दहिवडी व पुसेगाव, विटा, कराड येथे गेले काही दिवसापासून  आम्ही पोलिस आहोत पुढे चेकिंग चालू आहे. तुमच्या जवळच्या सर्व मौल्यवान वस्तू काढून एकत्र करून बांधून ठेवा. असे सांगून संबंधित व्यक्तींना हातचलाखीने काही चोर फसवत आहेत.
               अशा प्रकारच्या घटना या पूर्वी आपल्या आपले हद्दीत/ परिसरातही घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये शक्यतो वयस्कर लोकांना टार्गेट केले जात आहे. तरी आपल्या परिसरातील वयस्कर लोकांनी सावध रहावे. याकरिता त्यांना पोलीस पाटील/ आपले गावातील व्हॉट्सॲप ग्रूप इत्यादी मार्फतीने सूचित करण्यात यावे . शक्यतो वयस्कर व्यक्तींनी अंगावर जास्त दागिने घालू नये.
          तसेच इतर प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये घरी जाऊन महिलांना सोने पाॅलिश करून देतो असे सांगून व त्यां माध्यमातून नागरिकांना हातचलाखीने फसवितात. व आपल्याकडील मौल्यवान दागिने चोरून घेऊन जातात. नागरिकांना विनंती आहे की , अशा भामट्यांपासून सावध रहा. आपल्या घरात अनोळखी व्यक्तींना येऊन देऊ नका. आपल्या गावात वा परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिस ठाणेशी संपर्क साधा किंवा पोलिस पाटील यांना कळवा. सतर्क रहा सुरक्षित रहा.
                 अक्षय सोनवणे
        सहाय्यक पोलीस निरीक्षक
           दहिवडी पोलीस स्टेशन

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!