स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडाकेबाज कारवाई* ३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरीस गेलेला ११,लाख रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत
व्हिजन २४ तास न्यूज (अहमद मुल्ला )
By;सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द ;
. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकचे एक तपास पथक तयार करुन त्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
दिनांक ०८/०३/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने, रा. मोरया हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं. ५, फ्लॅट नं. ६१०, वेताळनगर, चिंचवड पुणे याने सातारा शहरातील फ्लॅट नं. १०३, निर्मिती हाईटस्, निशीगंधा कॉलनी, समर्थनगर सातारा येथील घरफोडी केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे पथकास नमुद आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
नमुद तपास पथकाने आरोपीच्या ठिकाण्याबाबत गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे माहिती प्राप्त करुन त्यास ताब्यात घेवून सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ९७१/२०२२ भादविक ४५४, ५७, ३८० या गुन्हयाचे तपासकामी अटक केली. नमुद गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपीने आणखी दोन गुन्हयांची कबुली देवून तीनही घरफोडीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ८, २८, ५०० /- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे (चालू बाजार भावाप्रमाणे ११,००,००० /- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे) हस्तगत करण्यात आलेलेआहेत.
समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, अजित कर्णे, स्वप्नील माने, प्रविण
कांबळे, स्वप्नील दौंड, शिवाजी भिसे, केतन शिंदे, प्रविण पवार, मोहसिन मोमीन, गणेश कचरे, अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे . समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ReplyForward
|