आगामी नगर पालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर लढणार :काशिनाथ शेवते
व्हिजन २४ तास न्युज
BY :Ahmad Mulla
म्हसवड ;
आगामी नगर पालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर लढणार आहे. कार्यकर्त्यानी जय्यत तयारीला लागा. अशा सूचना राष्टीय समाज पक्षांचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिल्या
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माण खटाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली, या मतदारसंघात येणाऱ्या माण तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गट, म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत तसेच खटाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट, सहा पंचायत समिती गण, वडूज नगरपंचायत साठी प्रत्येकी एक निवडणूक प्रभारी नियुक्त करण्याचे आदेश पक्षाने दिले होते, त्या आदेशा प्रमाणे सर्व पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आणि ते सर्वजण आजच्या बैठकीला हजर होते. माण खटाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामघ्ये मोठा उत्साह होता
माढा लोकसभा मतदारसंघातील इतर सर्व विधानसभा प्रभारी यांनीही नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या .
या वेळी राष्टीय समाज पक्षांचे प्रदेश अध्यक्ष मा. काशिनाथ शेवते राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे प्रदेश महासचिव माऊली सलगर,प्रदेश उपाध्यक्ष मा बबनदादा वीरकर, माण मार्केट कमेटी उप सभापती सौ वैशाली वीरकर, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ पूजाताई घाडगे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर ,उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे, माण खटाव अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे ,माण तालुका अध्यक्ष दत्ता खांडेकर, जिल्हा युवक सचिव आकाश वीरकर उपस्थित होते.
मान्यवर मंडळीने माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर ताकतीने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. रासप चे संस्थापाक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांना या या लोकसभा मतदार संघातून निवडून देणयासाठी माढा मतदार संघात सर्व विधानसभा मतदार संघात कार्यकर्ते ची भक्कम टीम तयार करण्यासाठी ची मोहीम हाती घेण्यात आली असून . माढा मतदार संघाकारिता प्राचारा चे म्हसवड हे प्रमुख ठिकाण असेल हे शेवते यांनी जाहीर केले. तसेच येणाऱ्या नगर पालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर लढणार आहे. याची जय्यत तयारीला लागा असा आदेश प्रदेशाध्यक्ष शेवते यांनी कार्यकर्त्यांना दिला . यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.