महिलांमध्ये गुणवत्ता असते, कोणतेही काम करण्याची क्षमता असते; तीला फक्त संधीची आवश्यकता आहे : डॉ सचिन माने
व्हिजन२४ तास न्यूज
By ; Ahmad Mulla
म्हसवड
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने महिला व बालविकास योजनेंतर्गत महिला उद्योजकता महोत्सव, शिलाई मशीन प्रशिक्षण यामध्ये सहभागी महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी आयोजीत कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ. सचिन माने बोलत होते, सदरच्या कार्यक्रमास , महिला बॅकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार भुजबळ, सातारा जिल्हा बॅकेच्या शाखाधिकारी सविता शिंदे , प्राध्यापिका सौ डॉ सोफिया मुल्ला, गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोरड मॅडम, नगरसेवीका सविताताई म्हेत्रे, लेखाधिकारी शितल गुजर, आस्थापना विभाग प्रमुख सुवर्णा विभुते, महिला व बालकल्याण विभागाच्या अनिता करांडे, सुप्रिया पवार, महेश सोनवले, चैतन्य देशमाने, सागर सरतापे यांची प्रमुख उपस्थिती होती
या प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी डॉ सचिन माने म्हणाले आज महिला आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे आपल्या देशाला महिलां महापुरुषांची फार मोठी परंपरा लाभली आहे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रिबाई फुले अहिल्यादेवी होळकर माता रमाबाई अशा अनेक महिलांनी खुप मोठा आदर्श निर्माण केला आहे कोणतीही महिला कमी नाही ती पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तुत्त्व सिद्ध करु शकते महिलामध्ये गुणवत्ता असते कोणतेही काम करण्याची क्षमता असते तीला फक्त संधीची आवश्यकता आहे आणी ती संधी मिळवून देण्याचे काम प्रत्येकाने आपआपल्या मार्फत केले पाहिजे आम्ही नगरपालीकेतर्फे एक छोटीशी संधी उपलब्ध करुन दिली त्याचे त्यांनी सोने करुन दाखवले
यावेळी महिला बॅकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन नगरपालीकेतर्फे सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना चेतना सिन्हा म्हणाल्या
जगभर कितीही सत्कार होऊ दे पण ज्यावेळी आपल्या गावात आपल्या लोकांकडून सत्कार होतो त्याचा आनंद व अभिमान फार मोठा असतो आमच्या म्हसवडच्या महिला खुप कष्टाळू आणी सहनशिल आहेत पूर्वी पासून येथील महिलानी विज आणी पाण्याचा तुटवडा होता त्यावेळी खुप संघर्ष या महिलांनी केला होता विजेकरीता हजारो महिलांनी नगपालीकेत स्वताला कोंडून घेतले होते पाण्यासाठी रास्ता रोको केले होते अशा या धाडसी व कष्टाळू महिलांना मानाचा सलाम करते नगरपालिकेने उद्योजिका मोहोत्सव भरवला आणी त्यात महिलांनी मोठ्या संखेने भाग घेऊन हम भी कम नही हे दाखवुन दिले त्याच प्रमाणे नगरपालिकेने सफाई कामगारांचाही या निमित्त सत्कार ठेवला हे खरोखर वाखानण्यासारखे आहे प्रत्येकीने स्वत: स्वत: बद्दल अभिमान बाळगला पाहिजे मी काहीतरी करुन दाखवू शकते याचा अभिमान बाळगला तरच खऱ्या अर्थाने आतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होऊ शकतो
म्हसवड पोलीस ठाण्या सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार भूजबळ म्हणाले
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आज आपण जागतीक महिला दिवस साजरा करत आहोत नगरपालिकेने महिला उद्योजिका मोहोत्सव साजरा केला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे खरे तर महिलांना संधी दिली तर त्या जगाचा उद्धार करतील आणी हि संधी नगरपालिकाच्या माध्यमातुन दिली माणदेशी महिला बॅकेच्या चेतना सिन्हा या़नी महिलांसाठी खुप मोठे काम उभे केले आर्थिक दृष्ट्या महिलांना स्वावलंबी बनवलं महिलां जे आर्थिक नियोजन करतात ते आपल्या कोणालाही जमनार नाही त्यांना फक्त संधी द्या, त्या संधीचे सोनं करतील यात तीळमात्र शंका नाही महिलांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये पत्नी, आई, बहिण, मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिवसेंदिवस महिलांचे सबलीकरण होत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. अशा महिलांचा सन्मान करणे, आपल्या देशाची हिंदू संस्कृती आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा विभूते यांनी केले तर उपस्थितांचे आभार शितल गुजर यांनी मानले या कार्यक्रमाचे सर्व नियोजन व डेकोरेशन
सौ किरण महेश सोनावले यांनी केले