सातारा जिल्हा पोलीस दला मार्फत युवकांसाठी ‘उंच भरारी’ उपक्रमाची सुरुवात
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By : सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द :
सातारा जिल्हयातील अशी ठिकाणे जेथे युवकांमध्ये योग्य मार्गदर्शन, संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार होतात अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पहीलाटप्पा कौशल्य विकास व नोकऱ्या (रोजगार) सुरु करण्यात आला असुन १५ ते २५ या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वत:च्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दिनांक०६/०३/२०२३ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साहेब यांचे उपस्थितीत सातारा
सातारा शहर, सातारा तालुका शाहुपूरी व बोरगां या ठिकाणी विधीसंघ बालक तसेच गुन्हेगारीकडे आकर्षीत होत असलेले युवक यांना बोलावुन श्री. प्रशांत पाटील, संचालक,आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) यांनी हजर असलेल्या युवक व युवतींना
स्वयंरोजगाराची माहीती दिली व त्यांचे फॉर्म भरुन घेतले. मेधावी स्किल युनिव्हर्सिटी यांचे प्रवेश सल्लागार श्री.राकेश कांबळे तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे सातारा, पुणे विभागाचे प्रमुख श्री. युवराज भांडवलकर यांनी त्यांचे कडील कोर्सेसची सविस्तर माहीती देवुन नोकरी मिळणेबाबत मार्गदर्शन करुन तसे फॉर्म भरुन घेतले. सदर कार्यक्रमास एकुण १०५ युवक व युवतीनी त्यांचे पालकांसह सहभाग नोंदविला. युवक व युवती यांनी भरुन दिलेल्या फॉर्मप्रमाणे त्यांना आवड असलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजीत आहे.
दिनांक ०८/०३/२०२३ आज अखेर उंच भरारी योजने अंतर्गत पहिला टप्पा कौशल्य विकास व रोजगार अंतर्गत कोरेगांव, दहिवडी, पाटण, कराड, फलटण व सातारा उपविभागामधून एकुण ४२१ युवक व युवती व त्यांचे पालक यांचेशी सकारात्मकरित्या चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच या योजने अंतर्गत सातारा जिल्हयातील उर्वरित वाई उपविभागातील १५ ते २५ या वयोगटातील योग्य मार्गदर्शन व संधी अभावी गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असलेले युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच
त्यांना स्वत:च्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.