जागतिक महिला दिना निमित्त म्हसवड नगरपालिकेच्या वतीने शिलाई प्रशिक्षण व महिला उद्योजिका यांचा गुणगौरव समारंभ : डॉ सचिन माने

बातमी Share करा:

व्हीजन २४ तास न्यूज 
By ; Ahmad Mulla
म्हसवड
                       म्हसवड नगरपरिषद, म्हसवड तर्फे. महिला व बालविकास योजनेंतर्गत महिला उद्योजकता महोत्सव जागतिक महिला दिना निमित शिलाई प्रशिक्षण व महिला उद्योजिका यांचा गुणगौरव समारंभ   बुधवार दि. ०८/०३/२०२३ रोजी दुपारी १२ वाजता. आयोजित केला असून सर्व महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी केले आहे   
                महिला व बालविकास योजनेंतर्ग म्हसवड पालिका हद्दीतील सर्व महिलांसाठी म्हसवड पालिकेच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान महिला उद्योजिका प्रशिक्षणाच्या केलेल्या आयोजनास महिला उस्फुर्तपणे सहभागी झाल्या  त्यांना यामुळे नव नवीन कला शिकावयास मिळाल्या यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना येथील प्रांजली क्रिएशनच्या प्रांजली शिंदे या तज्ञांच्या मार्फत मराठमोळी काष्टा साडी, पेशवाई साडी, शाही मस्तानी साडी, राजलक्ष्मी साडी व महालक्ष्मी साडी शिवण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले   शहरातील महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला या प्रशिक्षणाचा महिलावर्गाला भविष्यात मोठा फायदा होणार आहे
               त्याचप्रमाणे दि. ३ मार्च ते ५ मार्च याकाळात म्हसवड पालिकेच्या वतीने महिलांसाठी उद्योजिका स्टॉलचेही आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले होते , या स्टॉलमधुन म्हसवडकर नागरीकांनी मोठ्या  प्रमाणावर वस्तू व खाद्यपदार्थ   खरेदी करून स्टॉल धारक महिलांचा उत्साह वाढवला  . तर यामध्ये सहभागी होणाऱ्या स्टॉल धारक महिलांना पालिकेच्या वतीने येथील बाजार पटांगण येथे मोफत स्टॉल उभारणी करून दिली गेली होती  त्यासाठी लागणारे विजेची सोय, पिण्याचे पाणी यासह अन्य मदतही पालिकेच्या वतीने  मोफत करण्यात आली होती तीन दिवस सुरु असलेल्या या महिला मोहोत्सवात म्हसवडकर नागरीकांनी मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन लाखो रुपयाची खरेदी करुन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले यात सर्वात मोठा वाटा  नगरपालिकेच्या कार्यालयीन अधिक्षक सुवर्णा  विभूते मॅडम व पालिकेच्या लेखाधिकारी शितल गुजर मॅडम यांचा होता
         महिलांनी उभारलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थाच्या स्टॉलधारकातुन तीन क्रमांक निवडण्यासाठी निरिक्षक म्हणून   प्राध्यापिका सौ. डॉ.सोफियॉ मुल्ला , सातारा जिल्हा बॅकेच्या शाखाधिकारी सौ. सविता शिंदे ,गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गोरड मॅडम यांची  नियुक्ती करण्यात आली होती  त्यांनी निरपेक्षपणे परिक्षण करुन गुणांकन केले या गुणांकणानुसार स्टॉलधारकांतुन प्रथम, द्वितीय व तृतीय असे ३ क्र. काढण्यात आले आहे या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आज गौरवण्यात येणार आहे तर सहभागी महिलांचाही प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला जाणार असल्याचे  मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी सांगीतले
स्थळ;   रुद्रपशुपती कोळेकर महाराज लिंगायत मठ                                                                                  
                                 (कोष्टी गल्ली)
                             ॐ गुरुमुर्ती हॉल 
                         म्हसवड ता. माण, जि. सातारा.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!