मोटार सायकल चोरट्यास बोरगाव पोलिस ठाणे पोलिसांनी केले शिताफीने अटक
व्हिजन २४ तास न्युज( अहमद मुल्ला )
By :सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द :
दिनांक ०५/०३/२०२३ रोजी सायंकाळी १८.०० वा चे सुमारास मौजे नांदगाव ता जि सातारा गावचे हद्दीत बोरगाव पोलीस ठाणे डि बी पथकाचे पोलीस नाईक स्वामी पो ना ब.न. २२०२. पो ना निकम ब.नं ७८४ पो ना शिखरे बन २२०९ पाई पेट्रोलींग करीत असताना कृष्णा नदीवरील पुलाचे पश्चिम बाजुस पुलाच्या कठडयावर एक इसम समोरच मोटर सायकल उभी करून बसलेला होता. पोलिस त्याचे समोरुन जाण्याचे तयारीत असताना त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो लगबगीने मोटर सायकल सोडुन नदी काठी पळुन जात असताना त्यास पो.ना शिखरे ब.नं २२०९ यानी जागीच पकडले व त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच ११ – हि ई ७६५८ हि सुमारे अडिच महिन्यापूर्वी कोपर्डे ता जि सातारा येथुन सकाळी ०६.०० वा चे सुमारास चोरुन नेहली असुन ती तो वापरत असल्याचे सांगितले त्यामुळे नमुद कर्मचारी यांनी सदर व्यक्तिचा बोरगाव पोलीस ठाणे गुरनं ३०४/२०२२ मा.द.वि कलम ३७९ या गुन्हयात सहभाग असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली. व त्याचे ताब्यात मिळालेली मोटर सायकल जप्त केली.
आज रोजी सदर आरोपीस सपोनि श्री रविंद्र गजानन तेलतुंबडे व पोलीस नाईक स्वामी च.नं २२०२ यांनी अधिक विश्वासात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने व त्याचा मित्र आकाश प्रकाश चव्हाण रा जुनाबुधगावरोड वाल्मिकी वसाहत असे दोघांनी ४ महिन्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरलेल्या मोटर सायकली विक्री करण्याकरीता एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत. असे सांगुन ६ मोटर सायकली तारगाव ता कोरेगाव जि सातारा गावचे हद्दीतून नदी काठालगत असलेल्या नदीपुल नावचे शिवारातुन झाडा झुडपातून सुमारे ५,१४,०००/- रु किमतीच्या एकुण ७ मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मोटर सायकली सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतुन-१, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन १ व सांगली बाजारपेठेतून ५ अशा मोटर सायकली आणलेल्या आहेत.
सदरची कारवाई हि मा.पोलीस अधिक्षक सो श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री किंद्रे सो यांचे मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई हि. श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे, पो.ना स्वामी ब.नं २२०२, पोहवा सावंत बन ४९८, पो.ना निकम ब.नं ७८४, पो.ना
शिखरे बन २२०९, पो को मोरे बन २३११ यांनी केली आहे.