जनसामान्यांची फसवणूक करणार्या ईन्कमरुट या कंपनीची चौकशी होऊन गुन्हे दाखल करा- संजय भोसले*
आ र्थिक लाभाची भली मोठी आश्वासने देऊन सामान्यांना गंडा घालणार्यांची कमी नाही.नुकतीच वेदांत्री व्हेंचर या कंपनीने कोट्यावधींची केलेली फसवणूक व गुन्हेगार जेलवारीवर असून या प्रकरणाची चौकशी सुरु असून शेकडो कुटुंबांना कष्टाच्या मात्र आमिशाला बळी पडून गुंतवलेल्या पैशांना मुकावे लागले असतानाच सध्या ईन्कमरुट कंपनीने एजंट आणी दलालांच्या माध्यमातून चांगलेच पाय रोवले असून कोट्यावधींच्या उड्यांचा बोलबाला सुरु आहेत.याकामी बहुतांश राजकारणी मंडळी,प्रशासनातील अधिकारी तसेच पोलीस दलातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने पुढाकारावरती असलेचे दिसून येत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकीसाठी प्रत्येक गुंतवणूकदाराचे डी मॅट खाते असणे आवश्यक असतानाच गुंतवणूकदाराचे स्वत:चे खातेवरुन व्यवहार झाले तरच त्या पैशांना व्यवहाराला कायदेशीर संरक्षण मिळू शकत असताना मात्र ईन्करुट कंपनी कायदेशीरपणे गुंवणूक व व्यवहार करताना दिसत नाहीये यामुळे गुंतवणूकदारांची शेवटी फसवणूक होऊन त्यांना कुठेदेखील दाद मागता येणार नाही व कष्टाचे पैशांना मुकावे लागू शकते म्हणूनच एजंटांच्या भूलथापा व बड्या बातांवरुन बेकायदेशीरपणे केलेली गुंवणूक फसवी ठरु शकते तरी गुंतवणूकदारांनी याची दखल घेऊन आपापले गुंतवलेले पैसे अशा परिस्थितीत माघार घेणे शहानपणाचे ठरु शकते. सध्या कंपनीमधील एजंट व दलाल मंडळी अशाप्रकारे खोटी आमिषे दाखवून गुंवणूक दारांचा पैसा शेअर मार्केटच्या नियमांचे उल्लंघन करत गोळा करत आहेत अशा सर्वांची चौकशी होऊन संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक समिर शेख यांचेकडे करत असलेचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी सांगतानाच सामान्य माणसांची फसवणूक करणार्या सुशिक्षित चोरांची टोळी लवकरच उजेडात आणणार असल्याचे देखील भोसले यांनी म्हटले आहे.