म्हसवड येथील परिक्षा केंद्रावर दहावी बारावीची परिक्षा सुरळीत ;. प्रवीण दासरे
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; अजितकुमार काटकर
वरकुटे वार्ताहर;
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येत असलेल्या दहावी बारावीची परिक्षा सुरळीत सुरळीत सुरु असल्याची माहिती प्राचार्य प्रवीण दासरे यांनी दिली आहे.
दहावी परिक्षेसाठी म्हसवड शहरातील सहा व परिसरातील चार अशा दहा हायस्कूलचे ४८५ विद्यार्थी केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित आहेत.त्यांची बॆठक व्यवस्था सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज, ज्ञानवर्धीनी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज तसेच दि. ८( हिंदी) व दि. १७ (विज्ञान) विषयांसाठी क्रांतिवीर शॆक्षणिक संकुलातील २० वर्ग खोल्यांमधुन करण्यात आली असल्याची माहिती केंद्र संचालक अजित काटकर यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी उपकेंद्र संचालक म्हणून उपमुख्याध्यापक सहदेव गुरव, विजय भागवत, बाळासाहेब कलढोणे तसेच संतोष देशमुख,प्रवीण भोते काम पहात आहेत.
बारावी परीक्षेसाठी सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज म्हसवड केंद्रावर फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या परिक्षा होत आहेत त्यासाठी म्हसवड मधील पाच व देवापुर येथील ६१८ परीक्षार्थी उपस्थित आहेत यांची बॆठक व्यवस्था सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज म्हसवड व ज्ञानवर्धीनी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथील २० वर्गखोल्यामधून करण्यात आली आहे.
या परीकसाठी केंद्रसंचालकांकडे म्हणून प्राचार्य प्रवीण दासरे, उपकेंद्र संचालक म्हणून सी वाय चव्हाण, डाॅ.डी डी नरळे, डी डी ननावरे काम पहात आहेत.
बारावीसाठी दुसरे केंद्र मेरीमाता हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे असून तेथे कला व वाणिज्य शाखेतील ३०४ विद्यार्थी परीकसाठी उपस्थित आहेत.त्यांची बॆठक व्यवस्था १३ वर्गखोल्यामधुन करण्यात आली आहे.या केंद्रासाठी केंद्रसंचालकांकडे म्हणून सानप व्ही डी काम पहात आहेत तर उपकेंद्र संचालक म्हणून सासणे एस टी, संतोष खासबागे,जवळकोटी मॅडम काम पहात आहेत.