माळशिरस तालुका पोलीस स्टेशन चा पदभार पोलीस पीआय राजेंद्र टाकणे यांच्याकडे.
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; Ahmad Mulla
म्हसवड;
पीआय राजेंद्र टाकणे यांनी विविध ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले असून प्रशासकीय सेवा बरोबरच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत,१९९५ बैचचे अधिकारी आहेत.
सोलापूर मुख्यालयातून नुकतीच त्यांची माळशिरस येथे बदली झाली असून माळशिरस पोलीस स्टेशन चा पदभार त्यांनी आज स्वीकारलेला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे हे म्हसवड गावचे सुपुत्र असून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे यांनी मुंबई, पंढरपूर, करकंब, वैराग, औसा, परभणी शिरूर, कोल्हापूर,पुणे,या विविध ठिकाणी उल्लेखनीय कार्य केलेले असून,आणी नुकतीच त्यांची बदली माळशिरस येथे झाली आहे म्हसवड पत्रकार संघातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. माणदेशी न्यूज चे संपादक , जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.