म्हसवडकर नागरीकांनी महिला उद्योजिका महोत्सवाला मोठ्या संखेने भेट देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे ; सुवर्णा विभूते

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By :Ahmad Mulla
म्हसवड 
                   म्हसवड नगरपरिषदेने महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महिला व बालविकास योजनेंतर्गत  महिला उद्योजिका महोत्सवाचे आयोजन केले असून प्रथमच आपल्या नगरीत अशा  प्रकारचा मोहोत्सव  भरत असून या मोहोत्सवात म्हसवड नगरीतील महिलांनी आपण स्वत: तयार केलेल्या वस्तू पदार्थ विक्रिकरीता मांडलेले आहे तरी नागरीकांनी मोठ्या संखेने याठिकाणी भेट देऊन महिलांनी सुरु केलेल्या या लघुउद्योगाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन   कार्यालयीन अधिक्षक सुवर्णा  विभूते मॅडम यांनी केले 
म्हसवड पालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बालविकास योजनेंतर्गत एक पाऊल पुढे टाकत शहरातील महिला उद्योजिकांना नवीन व्यासपिठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी म्हसवड बाजार पटांगण येथे 3 दिवस महिला उद्योजिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले  आहे या मोहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी   कार्यालयीन अधिक्षक सुवर्णा  विभूते मॅडम  बोलत होत्या
 सिद्धनाथ देवस्थानचे सालकरी यांच्या पत्नी सोनाली गुरव व मठाधिपती रविनाथ महाराज यांचे हस्ते सकाळी ११ वाजता या  मोहोत्सवाचे उद्घाटण करण्यात आले यावेळी खंदारे मॅडम ,प्रांजली शिंदे, नगरसेविकी सविताताई म्हेत्रे, लेखाधिकारी शितल गुजर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
    सुवर्णा    विभूते मॅडम यानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या मोहोत्सवात म्हसवडकर नागरीकांनी मोठ्या संखेने उपस्थिती लावली
पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पालिकेच्या लेखाधिकारी शितल गुजर यांनी दिली असुन उर्वरीत काळात हि उलाढाल वाढण्याची शक्यता वर्तवली आहे, तर हा महोत्सव पालिका हद्दीतील महिलांसाठी एक पर्वणी ठरत असल्याचे मत गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
म्हसवड पालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बालविकास योजनेंतर्गत एक पाऊल पुढे टाकत शहरातील महिला उद्योजिकांना नवीन व्यासपिट उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी येथील बाजार पटांगण येथे 3 दिवस महिला उद्योजिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये पालिका हद्दीतील महिलांसाठी म्हसवड पालिकेच्या वतीने मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. सदर महोत्सवामध्ये म्हसवड पालिकेच्या हद्दीतील 35 महिलांनी आपली नावनोंदणी करीत याठिकाणी महोत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे, या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिला स्टॉलधारकांना पालिकेच्या वतीने मोफत स्टॉलची उभारणी करून देण्यात आली आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल लावले असुन हा महोत्सव पाहण्यासाठी म्हसवडकर गर्दी करू लागले आहेत. दि.3 रोजी सुरु झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी म्हसवडकरांनी येत तूफान खरेदी केल्याने महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. बऱ्याच महिलांनी देशी धपाटे पाणीपुरी  व्हेजबिर्याणी भेळ याला पसंदी दर्शविली आहे तर सदर महोत्सव हा आणखी 2 दिवस म्हणजे 5 पर्यंत चालणार असल्याने ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. सदर महोत्सवामध्ये कटलरी, खेळणी, कपडे, माणदेशी वस्तु, लोणची, चटणी, पापड, कडधान्य, कापडी पिशव्या, नर्सरी, रसवंती, यासह खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक स्टॉल लावण्यात आले असुन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी येथील सर्वच स्टॉलधारकांना समाधान कारक धंदा झाला असल्याचे येथील व्यावसाईकांनी सांगितले तर पालिकेने यापुढे प्रत्येक वर्षी अशा महोत्सवाचे आयोजन करावे अशी मागणी येथील स्टॉलधारक महिलांनी केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!