महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत म्हसवड ची सुकन्या,, कु. वेदिका विठ्ठल सजगाणे, प्रशासकीय अधिकारी वर्ग -१ पदी निवड.

बातमी Share करा:

व्हिजन२४तास न्यूज म्हसवड
By ; Ahmad Mulla
म्हसवड
               महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२१ चया परीक्षेचा निकाल  नुकताच, २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर  झाला. त्या परीक्षेत म्हसवड – विरकरवाडी ता. माण जिल्हा साताराची सुकन्या, कु. वेदिका विठ्ठल सजगाणे हिने उत्तुंग भरारी घेत प्रशासकीय अधिकारी वर्ग – १  या पदासाठी गवसणी घालणारी म्हसवड येथील पहिलीच विद्यार्थ्यीनी  होय. तर  विरकरवाडी च्या वैभवात भर घालणारया अनेक पदाधिकारयापैकी  एक होय.
 कु. वेदिका सजगाणे हिचा जन्म म्हसवड ता. माण जिल्हा सातारा येथे झाला. प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद शाळा म्हसवड नं.  ३  मुलींच्या शाळेत बाजार पटांगण येथे झाले. सुरवातीपासून च गुणवंत विद्यार्थिनी म्हणून नावलौकिक होता. सकाॅलरशिप परीक्षेत, इ. ४ थी ती
 राज्य गुणवत्ता यादीत यश मिळाले होते.  माध्यमिक शिक्षण:-  महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय म्हसवड मध्ये, इ. १० वी पर्यंत झाले.  कन्या विद्यालयामध्ये सुद्धा एक आदर्श  गुणवंत विद्यार्थिनी म्हणून नावलौकिक मिळविला होता. इ. १० वी बोर्ड परीक्षेत गणित व विज्ञान विषयात  पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता.
  सर्वगुणसंपन्न अशीच ख्याती तिनं मिळवली होती. डान्स स्पर्धा,   भाषण स्पर्धा,  क्रिडा स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये ती सतत यशवंत होती.
 उच्च. माध्यमिक शिक्षण:- इ. १२ वी.  वाय. सी. काॅलेज सातारा येथे शिक्षण घेतले. सातारा येथे शिक्षण घेत असताना अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन, कृतीशीलता प्राप्त केली.
 पदवी शिक्षण:-  पुढील उच्च पदवी शिक्षण , मुंबई विद्यापीठातून  Biomedical engineering  चे  शिक्षण पुर्ण केले. व पुढील स्पर्धा परीक्षा देऊन  म्हसवड चा नावलौकिक वाढविण्यासाठीचे ध्येय निश्चित करून, सन २०२१  ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २८ पण
फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यात, रॅंक ३०४ वा,  तर जनरल मुलींमधील  महाराष्ट्रातील रॅंक २१ वा तर      राखीव प्रवर्गातून महाराष्ट्र रॅंक २ रा मिळवून , प्रशासकीय अधिकारी वर्ग -१ या पदासाठी गवसणी घालणारी म्हसवड शहरातील पहिलीच  महिला अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर वेदिका सजगाणे हीने विरकरवाडी ता. माण. जिल्हा सातारा या पदाधिकारी या गावच्या नावलौकिक आणखी एक भर टाकत
 विरकरवाडी या तिच्या मुळ गावचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन  एक नवीनच दबदबा निर्माण केला आहे.
 कु. वेदिका सजगाणे  सोबतच तिचा चुलत भाऊ  चि. मुकेश सजगाणे यांनी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत, पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केली आहे. चि. मुकेश सजगाणे यांनी काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत , प्रशासकीय अधिकारी वर्ग -२  या पदावर कार्यरत असताना सन २०२१ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेला आहे. कु. वेदिका सजगाणे  व  चि. मुकेश सजगाणे यांनी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रशासकीय अधिकारी होऊन, संपूर्ण सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यातील म्हसवड – विरकरवाडी गावचा नावलौकिक वाढविला आहे.  याबद्दल संपूर्ण सातारा जिल्ह्यासह, माण तालुक्यातील म्हसवड पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!