अमित मुल्ला यांची सलग तिसऱ्यांदा म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज 
By :Ahmad Mulla 
म्हसवड 
     नुकतीच  म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनची निवडणूक संपन्न झाली यावेळी अध्यक्ष पदी अमित मुल्ला यांची तिसऱ्यांदा बहुमताने  निवड झाली. म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनची आज वार्षिक बैठक संपन्न झाली यामध्ये महत्वपूर्ण ठरावासह अध्यक्ष पदासाठीची निवडणूक घेणेत आली यावेळी मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत अमित मुल्ला हे बहुमताने  निवडून आले आणि सलग  तिसऱ्यांदा म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनच्या  अध्यक्षपद भूषविण्याची संधी आज त्यांना सभासदांनी दिली.
यावेळी अध्यक्षांसह उपाध्यक्ष राजेंद्र काशिनाथ केवटे, सचिवपदी धनंजय पानसांडे, कोषाध्यक्ष म्हणून सचिन अनंत सरतापे यांची निवड करणेत आली. निवडी नंतर बोलताना अमित मुल्ला म्हणाले यापुढे अध्यक्ष म्हणून असोसिएशन साठी  नवनविन उपक्रम राबवणार असून  यापुढे म्हसवड शहरात फोटोफेअर भरविणार आहे ज्यामुळे फोटोग्राफर बांधवांना येणाऱ्या नवनवीन असेसरिज ची माहिती मिळणार आहे.
यासाठी सर्व फोटोग्राफरने बरोबर घेऊन सामाजिक कार्यक्रम देखिल राबविण्याचा यापुढे प्रयत्न असेल. यावेळी सचिन सोनवणे, राहुल खटावकर, दत्ता ढवळे, संभाजी झीमल, सुनील करपे, जितेंद्र गलांडे, गजकुमार ढोले, चंदू बनगर आदी फोटोग्राफर यांची उपस्थिती होती यावेळी सर्व नुतन पदाधिकाऱ्याचे हार गुच्छ देऊन अभिनंदन करणेत आले.
   फोटोग्राफर असोसिएशनच्या  अध्यक्षपदी अमित मुल्ला व उपाध्यक्षपदी राजेंद्र केवटे याची निवड झाल्याबद्दल पत्रकार  पोपट बनसोडे, अहमद मुल्ला, विश्वनाथ भागवत यांनी त्यांचे  अभिनंदन केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!