सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड येथील दहावी परीक्षेची बॆठक व्यवस्था पुर्ण.

बातमी Share करा:

 व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड( अहमद मुल्ला )
By ; अजितकुमार काटकर
वरकुटे  प्रतिनिधी ;
      दि.२ मार्च पासून सुरू होणा-या सिद्धनाथ हायस्कूलव ज्युनिअर काॅलेज म्हसवड येथील  दहावी परीक्षेची बॆठक व्यवस्था पूर्ण झाली आहे. 
यावेळी ही परिक्षा सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज, ज्ञानवर्धीनी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज याच बरोबर क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल या ठिकाणी होणार आहे. 
     दि. ८ व दि.१७ रोजी दहावी व बारावीचा पेपर एकाच वेळी आल्याने त्या दिवसाचे दहावीच्या परिक्षेची बॆठक व्यवस्थेसाठी सिद्धनाथ हायस्कूल बरोबरच क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल या उपकेंद्रावर करण्यात येणार आहे.याची बॆठक व्यवस्था संबंधीत शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
     विद्यार्थ्यांने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्र (रिसीट) ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) व लेखनसाहित्य घेऊन शालेय गणवेशात परीक्षा वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थित रहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
         विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई केली गेली आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
     या परीक्षेसाठी प्राचार्य प्रवीण दासरे,प्राचार्य गोपाळ मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक अजित काटकर, उपकेंद्र संचालक विजय भागवत व कलढोणे सर यांच्यासह प्रवीण भोते, संतोष देशमुख हे काम पहात आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!