*क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्यूज (अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ माण चौफेर चे संपादक बापूसाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,संस्था सचिव सुलोचना बाबऱ, माण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मंगरूळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात १६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी सुंदर अशा प्रदर्शनातून उपक्रमाद्वारे पाणी बचतीचा संदेश ,माती विना ही शेती करता येते अशी हायड्रोपोनिक शेतीची संकल्पना ही आपल्या प्रयोगातून सादर केली. ऑरगॅनिक शेती पद्धती, वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टिम च्या माध्यमातून विजेची बचत ,आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक योजना, ऊर्जा उत्पादन,चुंबकीय उपक्रम अशा वेगवेगळ्या प्रयोगातून विज्ञान दिनाचे महत्त्व तपशीलवार दाखवून दिले.
या निमित्ताने संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व कथन केले. मानवी जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दैव वादापेक्षा विज्ञानवाद महत्त्वाचा असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले. थोर शास्त्रज्ञ व त्यांच्या संशोधनापासून प्रेरणा घेण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जिद्द व चिकाटी जोपासून टाकाऊतून टिकाऊ घडवण्याबाबतही मार्गदर्शन प्राध्यापक बाबर यांनी केले.

प्रस्ताविक करताना प्राचार्य राहुल फुटाणे म्हणाले की, या प्रदर्शनातून एखादा सी.व्ही.रमन किंवा आईन्स्टाईन निर्माण व्हावा असा हेतू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यातील वैज्ञानिक चिकित्सा व दृष्टिकोन जागृत करण्याबाबतचे प्रतिपादन त्यांनी केली.
क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल बरोबरच क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळे मध्ये ही विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी ही विद्यार्थ्यानी सक्रिय सहभागी होऊन आपले वैज्ञानिक वेगळेपण दाखवून दिले.
वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार विज्ञान प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल बापूसाहेब मिसाळ व सचिन मंगरुळे यांनी समाधान व्यक्त करून उपक्रमशीलते बद्दल शाळेला शुभेच्छा दिला .
या कार्यक्रमासाठी क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल,. तसेच क्रांतिवीर नागनाथ अण्णा शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते.