मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चौथा उमंग वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड

By ; Ahmad Mulla

गोंदवले ;

येथील साहारा एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चौथा उमंग वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चौथा उमंग वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली अध्यक्षस्थानी डॉ. संदीप पोळ (फिजिओथेरपिस्ट) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.क्षितिज सर (संस्थापक स्पॉटिनिअस ट्रेनिंग सेंटर दहिवडी) श्री. रोहन सर ( मॅनेजर स्पॉटिनिअस सेंटर दहिवडी) कुमारी सुप्रिया मॅडम. डॉ. समीर तांबोळी (मेडिकल सुप्रीटेंडंट) डॉ. समीना तांबोळी ( कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) मेघना मॅडम (मॅनेजर ऑफ क्रीडो सातारा सांगली झोन) श्री वसीम तांबोळी सर (डिरेक्टर ऑफ सोशल सर्विसेस डेव्हलपमेंट) श्री. इम्रान तांबोळी सर ( अध्यक्ष साहारा एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल ) सौ. रेश्मा तांबोळी (मुख्याध्यापिका मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल ) तसेच सर्व शिक्षक व पालक यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले होते, तसेच सूत्रसंचालन सौ. सोनाली पाटील मॅडम व कु. विनिता रणपिसे मॅडम यांनी केले

गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच माता सरस्वती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य करून सर्वांकडून दाद मिळवली नृत्य व नाटक यांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले. वर्षभरात घेतलेल्या कार्यक्रमात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेघना मॅडम यांनी क्रीडो प्रोजेक्ट विषयी सर्वांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे आभार कुमारी संध्या कदम मॅडम यांनी मांडले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!