दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध, सभापतींचा नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या हस्ते सत्कार
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ;दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
दहिवडी ता. माण येथील नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडी पीठासन अधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या तर सचिव म्हणून मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी काम पाहिले. सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.
स्थायी समितीच्या सभापतीपदी सागर पोळ, सदस्य राजेंद्र साळुंखे, मोनिका गुंडगे, नीलम जाधव, सुप्रिया जाधव यांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या.
बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुप्रिया जाधव, सदस्य सुरेंद्र मोरे, सदस्य महेश जाधव, उज्ज्वला पवार, विजया जाधव,
पाणीपुरवठा समिती सभापतीपदी राजेंद्र साळुंखे, सदस्य नीलिमा पोळ, विशाल पोळ, रुपेश मोरे, शैलेंद्र खरात,
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नीलम जाधव उपसभापतिपदी वर्षाराणी सावंत,सदस्यपदी सुरेखा पखाले, विशाल पोळ,
स्वच्छता , वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी मोनिका गुंडगे, सदस्य वर्षाराणी सावंत,महेश जाधव, राणी अवघडे, शैलेंद्र खरात यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. निवडी झाल्यानंतर पीठासन अधिकारी किरण जमदाडे, मुख्याधिकारी यांनी स्वागत करून अभिनंदन केले.
दरम्यान या निवडी झाल्याबद्दल नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती सुप्रिया जाधव, नीलम जाधव, मोनिका गुंडगे व राजेंद्र साळुंखे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक शामराव नाळे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव, नगरसेवक महेश जाधव, सुरेंद्र मोरे, विशाल पोळ, रुपेश मोरे, शैलेंद्र खरात उपस्थित होते.