मिरज शहरात उरूस कालावधीत वाहतूक नियमन
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
सांगली :
मिरज शहरातील हजरत शमना मिरासो दर्गा येथे उरूस कालावधीमध्ये जिल्हा व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये 15 फेब्रुवारी 2022 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 28 फेब्रुवारी 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत ह. शमनामिरासो दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणे या मार्गावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड या वाहनांखेरीज सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.
मिरज शहरातील हजरत शमना मिरासो दर्गा येथे आयोजित उरूसाच्या अनुषंगाने 15 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ह. शमनामिरासो दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. मिरज मार्केट कडून एस.टी.स्टँडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – (१)मिरज मार्केट – जवाहर चौक – शास्त्री चौक – फुले चौक मार्गे – एस टी स्टँड, (२)मिरज मार्केट – शाहु चौक मार्गे एस टी स्टँड. एस.टी.स्टँड कडून मिरज मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – (१) एस टी स्टँड – फुले चौक – शास्त्री चौक – जवाहर चौक मार्गे – मिरज मार्केट, (२) शाहु चौक मार्गे – मिरज मार्केट. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जारी केले आहेत.