दहिवडीत पन्नास लाखाच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लवकरच 41 कोटी रुपयांची ‘अमृत 2.0’ योजनेचा शुभारंभ होणार
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ;दौलत नाईक*
दहिवडी/प्रतिनिधी :
दहिवडीकरांचा पाणी प्रश्न सुटणार असून पन्नास लाख रुपये किंमतीच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ दहिवडी नागरपंचायतीच्या वतीने आज करण्यात आला असून लवकरच 41 कोटी रुपयांची ‘अमृत 2.0’ योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीकडून नागरिकांना सध्या चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीकडून नवीन पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पंधराव्या वित्त आयोगातून मोरेमळा विहीर ते प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकी पर्यंत उच्च घनता पाॅलिथिलिन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी ५०.०९ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.
आज या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजू साळुंखे, राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, सुनिल पोळ, नगरसेवक महेश जाधव, शामराव नाळे, सुरेंद्र मोरे, व विशाल पोळ तसेच महेंद्र जाधव, सुरज गुंडगे, शामराव निकम, राजू पोरे, पोपट वाघ, संजय ढवाण, वरद पवार, शुभम खांडे, सुरज कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
………….
चौकट : “नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी ही पाईपलाईन उपयुक्त ठरणार आहे आगामी काळात पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेतली जाईल.” सागर पोळ, नगराध्यक्ष.
नगरपंचायतीमार्फत विविध विकास कामे सुरु आहेत, आज झालेल्या पाणी पुरवठा योजना पन्नास लाखांची असून येत्या महिनाभरात 41 कोटी रुपयांच्या ‘अमृत 2.0’ या योजनेचा शुभारंभ माण खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात येणार आहे. या योजनेमुळे सतरा प्रभागात नागरिकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
महेश जाधव– मा. बांधकाम सभापती तथा नगरसेवक