सोलापूर पक्षी संशोधन केंद्र सुरु करत आहे मोरांचा ठेपा!*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By : सुर्यकांत खंदारे  (पक्षी संशोधक )
नांदेड :

 

            राजा म्हणजे अधिपती / भूपति, सर्वदूर भारतात अधिवास असलेला मोर हा सुद्धा पक्षी जगतातला राजा.डोळ्याचं पार्ण फेडणार सुंदरता, रंगाची विलोभनीय घडण, रेशमी चमक असलेला मोर, जेव्हा लांडोर साठी पिसारा फुलवून नाचतो तेव्हा पाहणाऱ्यास स्वर्ग अनुभूती होते.राष्ट्रीय पक्षी असलेला मोर सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे.सोलापूर सोडलं तर महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्हात मोरांचे रखावले तयार झाले आहेत. मोरांची आई, मोराशी नातं, मोरांच्या हत्या होत आहेत, या मसुद्या खाली मोराचं निसर्गिक जीवन या लोकांनी समाप्त केल आहे
             मोराला दाणे खाऊ घालण्याचा अधिकार कुणी दिला, नैसर्गिक अधिवासात जाऊन अशा प्रकारे जैवावीविधतेत ढवला ढवलं का होत आहे. या सर्व प्रकारस पक्षी संशोधक यांच्या मते एकच उत्तर असेल ते म्हणजे *मोरांचा ठेपा*,ठेपा म्हणजे आधार, ठरलेलं ठिकाण, जिथे मोरांना नैसर्गिक जीवनात जगताना पाहता येईल, त्यांना कुणीही तिथे गुलाम, पाळीव बनवणार किंवा त्यांचे मालक बनणार नाही, त्यांच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभा करून दानापानी करणार नाही. *मोरांचा ठेपा* जे मोरंच अस्तित्व किती स्वातंत्र्य मुक्त पणे जगात आहे आणि जैविविधता कशा मानवी हस्ताक्षेपशिवाय समवृद्ध असतें हे दर्शवेल.
आपला
 एकमेव आधुनिक पक्षी संशोधक
सूर्यकांत खंदारे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!