दहिवडी पोलिसांचा अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच* *सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह दमदार कामगिरी*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ; दौलत नाईक
 दहिवडी/प्रतिनिधी:
          चोरटी दारुची वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या.. ओमनी कारसह ३ लाख ५३ हजार  ७४० रुपयांचा माल केला जप्त 
                पिंगळी खुर्द ता.माण येथील  राहुल पवार हा अवैध दारूची वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची खबर दहिवडी पोलिसांनी मिळताच सापळा रचून त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले आहे.त्याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहिती अशी, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अक्षय सोनवणे यांना राहुल लालासो पवार राहणार पिंगळी खुर्द तालुका माण हा बेकायदेशीर रित्या दारूची वाहतूक करणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी स्वतः व पोलीस सहकार्यांच्या मदतीने सातारा ते गोंदवले बुद्रुक जाणारे रोडवर सापळा रचून ओमनी कार क्रमांक MH 08–C-1474 मधून देशी,विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या राहुल लालासो पवार राहणार पिंगळी खुर्द यास रंगेहाथ पकडले. तसेच त्याच्याकडील 3,53,740/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हा नोंद करून त्याच्या मुस्क्या आवळल्या.
 दहिवडी पोलिसांचे अवैद्य धंद्यावरील ही मोठी कारवाई झाल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई   पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर,  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक निर्मळ ,सहायक फौजदार प्रकाश  हांगे, पोलीस नाईक बनसोडे,पो ना वावरे  यांनी केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!