संजीवजी तूपसाखरे साहेब व इंजिनीयर सुनील पोरे साहेब यांचा फलटण येथे नामदेव शिंपी समाजातर्फे जाहिर सत्कार
व्हिजन २४ तास न्युज
By:अहमद मुल्ला
म्हसवड;
श्री संजीवजी तूपसाखरे साहेब रा .नाशिक यांची नामदेव समाज उन्नती परिषदेच्या राज्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच इंजिनीयर श्री सुनील पोरे साहेब रा. म्हसवड यांची नामदेव समाज उन्नती परिषद सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे त्यानिमित्त त्यांचे फलटण येथे मार्गदर्शन व सत्कार समारंभ आयोजित केला आहे
फलटण येथिल नामदेव शिंपी समाजातर्फे शनिवार( दि २५ )रोजी दुपारी ४ वाजता* नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर फलटण येथे या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे माननीय श्री तूपसाखरे साहेब राहणार नाशिक नासप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,अँड. श्री विश्वनाथ टाळकुटे साहेब मुंबई हायकोर्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
इंजिनीअर सुनील पोरे जिल्हाध्यक्ष ना. स. प. सातारा यांचा शनिवार ( दि.२५ ) रोजी दुपारी १२.३० वाजता लोणंद, दु.२ वाजता तरडगाव , ३.३० वाजता निंबळक येथिल नामदेव शिंपी समाज बांधवाची भेट घेण्यासाठी दौरा करुन फलटण येथिल सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत
तरी या कार्यक्रमासाठी फलटण येथिल समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती श्री विजय उंडाळे अध्यक्ष विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण,व सौ पद्मा टाळकुटे अध्यक्ष महिला मंडळ फलटण यांनी केली आहे