अन्यथा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून एसटी महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले जातील, डॉ महादेव कापसे
व्हिजन २४ तास न्यूज
By; Ahmad Mulla
म्हसवड
म्हसवड शहराची शान असलेले म्हसवड एस टी बस स्थानक स्मशान भूमीचे रुप धारण केल्यासारखे दिसत आहे या नविन बसस्थानक इमारतीचे बांधकाम गेली कित्येक वर्षे अर्धवट स्थितीत आहे ते बाधकाम त्वरीत पूर्ण करावे यासाठी अध्यक्ष डॉ, महादेव कापसे-पाटील. संस्थापक, अध्यक्ष, कृष्णा खोरे पाणी संघ समिती महाराष्ट्र राज्य यांनी गेल्या वर्षी मोठया आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी दिले होते, की आम्ही येत्या सात महिन्यात टेंडर काढून काम चालू करू परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही केली गेली नाही त्यामुळे आता पुन्हा अध्यक्ष डॉ, महादेव कापसे-पाटील. संस्थापक, अध्यक्ष, कृष्णा खोरे पाणी संघ समिती महाराष्ट्र राज्य, यांनी ३१ मार्च २०२३ पूर्वी बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर चालू न झाल्यास १६ एप्रिल नंतर कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी सातारा येथील एसटी महामंडळाच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल व कार्यालयास टाळे ठोकले जाईल असा निवेदनाद्वारे ईशारा दिला आहे
विभागीय नियंत्रक. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा यांना दिलेल्या निवेदनात डॉ.कापसे यांनी म्हटले आहे की आम्ही आमच्या बस स्थानक बचाव समितीच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ पूर्वी काम चालू करावे, अन्यथा, आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला होता, त्यावेळी आपण सांगितले होते व लेखी दिले होते, की आम्ही येत्या सात महिन्यात टेंडर काढून काम चालू करू परंतु, आपण कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही तरी, गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये बस स्थानकाचे रखडलेले काम चालू होईल, अशा अपेक्षेने आम्ही थांबलो होतो. परंतु, आमचा अपेक्षा भंग झालेला आहे. म्हसवड शहर हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण आहे तसेच सिद्धनाथ हे तीर्थक्षेत्र असल्याने हजारो भाविकांची या बस स्थानकावरून ये -जा होत असते, त्यामुळे म्हसवड बसस्थानक म्हसवडचा आत्मा आहे. आणि या बस स्थानकाला स्मशानभूमीचे रुप धारण केले असल्यासारखे जाणवत आहे. तरी आपण आत्ता ३१ मार्च २०२३ पूर्वी बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर चालू न झाल्यास १६एप्रिल नंतर कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी सातारा येथील एसटी महामंडळाच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन एसटी महामंडळाचे प्रमुख, व सहकारी, यांना तोंडाला काळे फासून एसटी महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले जातील, याची गंभीर नोंद घ्यावी. तशा आशयाच्या सूचना आपल्या आदेशाने एसटी महामंडळास जाव्यात, एवढीच आपणाकडून मापक अपेक्षा, व तातडीने एसटी महामंडळाचे म्हसवड बस स्थानकाचे काम चालू व्हावे,अशी विनंतीअध्यक्ष डॉ, महादेव कापसे-पाटील. संस्थापक, अध्यक्ष, कृष्णा खोरे पाणी संघ समिती महाराष्ट्र राज्य,व अध्यक्ष, म्हसवड बस स्थानक बचाव संघर्ष समिती. यांनी केली आहे
निवेदनावर कार्यकर्त्यांच्या सह्या, ज्येष्ठ पत्रकार सलीम पटेल १) राहुल मंगरुळे, २) सुरेश उबाळे, २) प्रसाद माने, ३) पोपट काळेल,४) महेश सराटे ५) अजित केवटे ६) अमित कुलकर्णी ७) सागर शिंदे, ७) लखन मंडले, ८)आनंद बाबर या,कार्यकर्त्यांच्या सह्या,असून
या सह्यांच्या निवेदनाच्या प्रती १) जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा २) पोलीस अधीक्षक, सातारा.३) कॅबिनेट मंत्री, व प्रमुख, एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, मंत्रालय मुंबई 32 4)तहसीलदार, तहसील कार्यालय, माण. 5)पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलीस स्टेशन, म्हसवड. यांना देण्यात आल्या आहेत