शिक्षण हे वाघिणीचे दूध असून यशस्वी जीवनासाठी त्याचा सुयोग्य वापर करा ….. उर्मिला सावंत
व्हिजन २४ तास न्युज
BY; Ahmad Mulla
म्हसवड … प्रतिनिधी
शिक्षण हे वाघिणीचे दूध असून यशस्वी जीवनासाठी त्याचा सुयोग्य वापर करा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव सौ. उर्मिला पोपट सावंत यांनी म्हसवड येथे केले.
सौ उर्मिला सावंत यांना मंत्रालय मुंबई येथे अव्वर सचिव पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल, डॉ. पोपट सावंत यांना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल ,तर डॉक्टर अदिती सावंत यांची ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड तर्फे या सर्वांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर ,संस्था सचिव सुलोचना बाबर,तानाजी कापडे , प्रकाश सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अव्वरसचिव उर्मिला सावंत म्हणाल्या आजची युवा पिढी नशीबवान आहे., बदलत्या परिस्थितीतविद्यार्थ्यांना सर्व सुख सोई उपलब्ध आहेत.मार्गदर्शन सुद्धा योग्य प्रमाणात मिळत आहे.खरी गरज आहे ती कष्ट करण्याची. यशस्वी जीवनात कष्टाला पर्याय नाही.सध्याच्या जीव घेण्या स्पर्धेत शिकेल तोच टिकेल ही परिस्थिती आहे.चांगलं शिक्षण घेणारा नक्कीच उच्च स्थानावर पोहोचल्याशिवाय राहणार नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या दूरदृष्टीबद्दल त्यानी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर पोपट सावंत म्हणाले गरीबी ही यशस्वी मानवी जीवनातील संघर्षाचा पाया आहे. शालेय जीवनात चांगली संगत धरा,वेळेचे नियोजन करा.भरपूर अभ्यास करून आपल्या गुरुजन व आई-वडिलांचे नाव उज्वल करण्याचे आवाहन डॉक्टर सावंत यांनी केले. टीव्ही व मोबाईल पासून दूर राहा.या सुविधांचा गरजेपुरताच वापर करा. नियमित अभ्यासाबरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचे तसेच खेळात सक्रिय राहण्याचे आवाहन त्यांनी केले. अल्पवधीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुल यांनी केलेल्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करून या संकुलास उज्वल भवितव्य असल्याचे डॉक्टर सावंत यांनी स्पष्ट केले.
सावंत कुटुंबियापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले.प्रस्ताविक संस्था सचिव सुलोचना बाबर यांनी केले.यावेळी सावंत कुटुंबीय तसेच संकुलातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अनिल कुमार माने यांनी केले,तर उपस्थितांचे आभार उपशिक्षक सागर बाबर यांनी मानले.