माण चौफेर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By; विशाल माने
देवापूर प्रतिनिधी ;
माण चौफेर चा प्रथम वर्धापन दिन म्हसवड येथील मेकफॉल कॅफेत केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, डॉ. प्रमोद गावडे, पी एस आय विशाल भंडारे, रासप माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पूकळे, रासप जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादासाहेब दोरगे, पै. पोपटराव रुपणवर अमोल माने, सोमनाथ केवटे, ज्येष्ठ पत्रकार विजय टाकने, विठ्ठलराव काटकर, एल के सरतापे अहमद मुल्ला, विशाल माने, सचिन सरतापे, मासाळ साहेब गायकवाड सर यासह परिसरातील माण चौफेर प्रेमी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते
या कार्यक्रम प्रसंगी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माण तालुक्यांतील वरकुटे मलवडी सारख्या छोट्याशा खेड्यातून वर्ष भरापूर्वी सुरू झालेले माण चौफेर पोर्टल ने अल्पावधीत गरुड भरारी घेऊन वर्ष भरात तब्बल ७ हजार सबस्क्राईब र चा आव्हानात्मक टप्पा पार केला आहे. आज महाराष्ट्र भर या पोर्टल चे वाचक आहेत. बापूसाहेब मिसाळ यांनी माण चौफर च्या माध्यमातून घेतलेली गरुड भरारी अभिमानास्पद आहे.
डॉ प्रमोद गावडे म्हणाले की “बापूसाहेब मिसाळ हे अतिशय शांत सय्यमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून तालुक्यांतील पत्रकार बांधवांना सोबत घेऊन त्यांनी माण चौफेर च्या माध्यमातून घेतलेला वसा असाच पुढे अविरत सुरू ठेवून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व सामान्य पीडित, वंचितांना आपल्या पोर्टल च्या माध्यमातून न्याय देण्याचे म हत्वपूर्ण कार्य सुरू ठेवावे.
यावेळी रासप नेते आप्पासाहेब पूकळे,पत्रकार विजय टाकने, विठ्ठलराव काटकर, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पत्रका र विठ्ठल काटकर तर आभार पत्रकार अहमद मुल्ला सरांनी मानले. उपस्थितांनी माण चौफेर च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.