तळबीड पोलीस ठाणे मधील पोलिसांची दबंग कारवाई बेकायदेशीर ८३लाख,०९ हजार, २९६ गुटख्यासह व ३०लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १ कोटी,१३ लाख,०९ हजार, २९६ रु.किमतीचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ; सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द ;
तळबीड पोलीस ठाणे मधील पोलिसांची दबंग कारवाई
मौजे यशवंतनगर ता. कराड येथे बेकायदेशीर ८३ लाख,०९ हजार, २९६ रु.चा गुटखा व ३० लाख,रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १कोटी,१३लाख,०९ हजार, २९६ रु.किमतीचा मुद्देमाल वाहतूक करीत असताना मिळाले वाहनावर तळबीड पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यातआला
सविस्तर असे
दि.२१/०२/२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक सातारा यांचे आदेशान्वये दि. २०/२/२०२३ रोजी २३.०० ते ०४.०० अशी नाकाबंदी नेमण्यात आलेली होती त्या दरम्यान पोलिसांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असल्याने कर्नाटक राज्यातून आयशर ट्रक नं के.ए-३२-एए-३७७० मधून गुटख्याची विक्री होणार आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ याबाबत मा पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख साो तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर सो मा. उप विभागीय पोलीस अधिकारी साो कराड श्री रणजीत पाटील याना माहिती दिली
त्यानंतर त्याचे मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस निरीक्षक वरोटे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ पोलीस फौजदार बाकले, पो.हवा.४८३ ओंबासे, पो.हवा. १४७ पाटील, पो.कॉ.८९३ विभुते,पो.कॉ.१९२३ शिंदे तळबीड पोलीस ठाणेतून कार्यालयातून बाहेर पडून सरकारी गाडी मधून व खाजगी वाहनाने मसुर रोडवर निघाले बातमीचे ठिकाणी थांबून बातमीतील आशया प्रमाणे गाडी नं के ए-३२-एए-३७७० या गाडीची वाट पाहत असताना ०३.४५ वाजता सदर ठिकाणी कराड कडुन सदरची गाडी आली असता सदरची गाडी थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव गाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव महमद ताज्युद्दीन सैफुनसाब वालवाले रा. नरोना ता.आलम जि गुलबर्गा राज्य कर्नाटक असे सांगितले त्यावेळी त्याला गाडीमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांने आम्हाला गाडीमध्ये कोंबडी खादय आहे असे सांगितले परंतु मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार गाडीमधील मालाची खात्री करण्याचे असल्याने दोन पंचांना सहयाद्री साखर कारखाना, यशवंतनगर येथील विठठल मंदीरासमोर कराड ते मसुर जाणारे रोडवर बोलावून घेवुन शहानीशा करून सदरची गाडी नं. के. ए-३२-एए-३७७० मध्ये सुमारे ८३,०९, २९६ रुपये किमतीचा ५७४४ वजनाचा महाराष्ट्र प्रतिबंधीत असलेला अन्न पदार्थ (गुटखा) मिळून आला जप्त केला व सदर आरोपी १ ) महमद ताज्युद्दीन सैफुनसाब वालवाले रा. नरोना ता. आलम जि गुलबर्गा राज्य कर्नाटक व मेहबूब बाबुमिया रा. उडबल ता. हुमनाबाद जि. विदर राज्य कर्नाटक यांचे विरुध्द तळवीड पोलीस ठाणे गुरनं ३९ / २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक राहूल वरोटे तळबीड पोलीस ठाणे हे करीत आहेत… सदर प्रकरणी सदरचा गुन्हा गा.श्री. सगीर शेख पोलीस अधीक्षक व मा. श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक मा.उप विभागीय पोलीस अधिकारी सो कराड श्री रणजित पाटील यांनी केले मार्गदर्शनानुसार मा. आर. आर. वरोटे सपोनि तळबीड यानी सदरची कामगिरी केली म्हणून पोलीस अधीक्षक सतारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.