*शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदासाठी आपली बुध्दी गहाण ठेवली आहे काय ?-संजय भोसले*
व्हिजन२४तास न्यूज
By;Ahmad Mulla
बिजवडी;
–शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी खा.श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचे पत्र खुद्द राऊत साहेबांनी मुंबई पोलिस आयुक्त यांना दिले आहे.यामध्ये ठाण्याचा गुंड राजा ठाकूरचे नाव घेतले असून राऊत साहेब हे सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांचे संरक्षणाची जबाबदारी सरकारची असताना ,मंत्री शंभूराजे देसाई यांनी वृत्तवाहीनींवरती बेजबाबदारपणे बोलणे हे त्यांच्या शिक्षण,पद व घराण्याच्या सुंस्कृतपणाला काडीचे देखील शोभत नाही.संरक्षण व पुन्हा डामडौल मिळावा म्हणून हा केविलवाना प्रयत्न राऊत साहेब करत असलेचे वक्तव्य जबाबदार मंत्र्याने करणे उचित नसून.मंत्री पद कायम राहावे म्हणून शंभूराजेंची देखील कायम वायफळ बडबड, धडपड व मिडीयासमोरील पोपटपंचीपणा अख्या जनतेत लपून राहिलेला नाही. असा सणसणीत टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी मारतानाच ,फुटीर आमदारांचे केंद्रात आणी राज्यात सरकार असताना त्यांना नक्की कोणाची भिती वाटतेय म्हणून मागे पुढे पोलीस गाडीचे संरक्षण घेऊन त्यांना फिरावे लागत आहे असा प्रतिप्रश्न भोसले यांनी मंत्री शंभूराजेंना विचारला आहे.