सातारा शहरातील मटका / जुगार व्यावसायिक समीर कच्छी याचे जुगार अड्डयावर छापा टाकून १६लाख,२६ हजार,०७०/- रुपयाचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज  म्हसवड
By ;सादिक शेख   (पोलीस टाइम रिपोर्टर )
 गोंदवले खुर्द:   
       स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडाकेबाज कारवाई

सातारा शहरातील मटका / जुगार व्यावसायिक समीर कच्छी याचे जुगार अड्डयावर छापा टाकून १६लाख,२६ हजार,०७०/-रुपयाचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त
                                श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा
जिल्हयातील मटका / जुगार व्यावसायिकांचेवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या आहेत. तसेच सातारा जिल्हयातील सर्वात मोठया मटका धंदयाचा बुकी शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा संपुर्ण सातारा जिल्हयातील मटका व्यावसायिकांच्या प्रमुख असून सर्व आर्थिक बाबी त्याच्या निर्देशा नुसारच चालतअसतात त्यामुळे शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी यास लक्ष्य करुन त्याचेवर कारवाई करून मटका व्यवसायाचे कंबरठे मोडणे बाबत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली दोन स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील मटका / जुगार व्यावसायिकांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले.
                                  दि.१९/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरातील मटका / जुगार व्यावसायिक शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा त्याचे काळेवस्ती सैदापूर सातारा येथील राहते घरामध्ये कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवित आहे. प्राप्त झालेल्या बातमीमधील माहिती त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकांना देवून नमुद ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश त्यांना दिले.
त्याप्रमाणे नमुद पथकांनी प्राप्त माहितीच्या ठिकाणी जावून छापा टाकला असता मटका / जुगार व्यावसायिक शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा त्याचे १९ साथिदारांसह कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवित असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून १६,२६,०७० /- रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन त्यांचे विरुध्द सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.७४/२०२३म.जु.अ.क.४, ५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
            श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, वसंत जाधव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, शिवाजी भिसे, रोहित निकम, विशाल पवार, प्रविण पवार, पृथ्वीराज जाधव, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, मोना निकम, राधा जगताप, गिरीष रेड्डी, नारनवर यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू,बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
 आरोपींची नावे –
१) शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी वय ४२ वर्ष रा. काळे वस्ती, आंगणवाडी जवळ, सैदापूर सातारा  २) धनंजय संपतराव कदम वय ५५ वर्षे रा.८९१ शनिवारपेठ सातारा,  ३) अश्विन विनायक माने वय ४५ वर्ष रा.शेंद्रे ता.जि. सातारा,  ४) नासिर हुसेन दिलावर शेख वय ४० वर्ष रा.२२२३ बुधवारपेठ सातारा,  ५) सलिम कादिर खान वय ३५ वर्ष रा.६७२ शनिवारपेठ सातारा,  ६) शकिल कादर सय्यद वय ५१ वर्षेरा.२५९ शनिवारपेठ सातारा,  ७) विष्णू काशिनाथ सोनटक्के वय ४५ वर्ष मुळ रा.कोरुचीमाळ बाग इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर सध्या रा. काळेवस्ती, आंगणवाडी शेजारी, सैदापूर सातारा, ८) राजेश संपत कदम वय ५३ वर्ष रा.७७ पिलेश्वरी नगर करंजे सातारा,  ९) विकास राजू चव्हाण वय ३० वर्ष रा.३०५ शनिवारपेठ सातारा,  १०) संतोष रामचंद्र माने वय ४६ वर्ष रा. कोंडवे ता.जि.सातारा,  ११) अक्षय जोतिराम सोनावणे वय २१ वर्षे रा.मुजावर कॉलनी कराड,  १२) गजानन चंद्रकांत इरकल वय ५१ वर्षे रा.४५ शुक्रवारपेठ सातारा  १३) किशोर दिलीप साळुंखे वय २६ वर्षे रा. माळवाडी ता.जि.सातारा  १४) असद वाहिद सय्यद वय २७ वर्षे रा. जगदीश्वर कॉलनी सेदापूर सातारा  १५) असिफ बशीर खान वय ३८ वर्षे रा. ६७२, शनिवार पेठ सातारा  १६) साहिल शमिम उर्फ समीर शेख उर्फ कच्छी वय १९ वर्षे रा. काळेवस्ती सैदापूर सातारा  १७) संतोष मोहन गुरव वय ३२ वर्षे रा.काशिळ ता.जि.सातारा १८) प्रकाश तानाजी बोभाटे वय ३२ वर्षे रा.मुळीकवाडी ता. जि. सातारा  १९) श्रीकांत लक्ष्मण पाटील वय ६५ वर्षे रा.पाटखळ ता.जि.सातारा,  २०) अमर गणेश पवार वय २० वर्षे रा.गंगासागर कॉलनी मोळाचा ओढा सातारा

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!