जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीच्या औंध पोलीसांनी मुसक्या आवळून केले जेरबंद*

बातमी Share करा:

  व्हिजन २४ तास न्यूज  
By ; सादिक शेख पोलीस टाईम प्रतिनिधी
गोंदवले खुर्द;
                   औंघ पोलीस ठाणे हद्दीत मौजे चोराडे ता. खटाव गावी चोराडे ते म्हासुर्णे रोडवरील कुंभार पेट्रोलीयम सेल्स अँण्ड सर्व्हिसेस या पेट्रोलपंपावरील काम करणारा कामगार संजय गंगाराम अडागळे वय २९ वर्षे हा दिनांक २४/०१/२०२३ रोजी सकाळी ११.२० वा.चे सुमारास कलेक्शन झालेले ९८,४७०/- रुपये ची कॅशची पिशवी घेवून निमसोड येथे जाणेकरीता निघाला असता चोराडे बाजकडून म्हासुर्णे बाजूकडे जाणारे रोडने एका अनोळखी मोटार सायकल स्वाराचे मोटारसायकल वरुन जात असताना म्हासुर्णे बाजूकडे ३०० मीटर अंतरावर गेलो असता त्याने मोटार सायकल थांबवून. एकाने माझे तोंड दाबून धरले. व मला हाताने मारहाण दमदाटी करुन कॅशची पिशवी घेवून दोघेजण मोटारसायकल वरुन पळून गेले.
      वगैरे मजकूरचा गुन्हा दाखल झाल्याने सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे औंध पोलीसठाणेचे प्रभारी स.पो.नि.दराडे व त्यांचे सहका-यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा आधारे तीन आरोपी निष्पन्न केले. सदर दोन आरोपीस कराड येथून ताब्यात घेवून अटक करुन आरोपीकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ३३,०००/- रुपये
रक्कम हस्तगत करण्यात आली असून आणखी एक आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीस अटक करुन उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करीत आहोत. मिळाला मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
             सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक,सो, श्री. बापू बांगर यांचे सुचनेनुसार मा. उपविभागीय पोलीस अधि. दहिवडी विभाग कॅम्प वडूज श्री. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहा. पोलीस फौजदार बी. एन. जाधव, पो.हवा.पी.पी.पाटील ब.नं.५८१, पो.हवा. आर. एस. वाघ ब.नं.११२९, पो.ना.एस.एच.पाडळे ब.नं.२३५४, पो.ना.आर.एस. सरतापे ब.नं.६८३, पो.कॉ.के.एल.जाधव ब.नं.२६११, पो.कॉ.के.एन.हिरवे ब.नं.५१० यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!