वाकळवाडी तालुका खटाव येथील शेतात लावलेला तब्बल 75 किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ; व्हिजनवार्ता
वडूज ;
    वडूज पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
            वाकळवाडी तालुका खटाव येथील शेतात लावलेली तब्बल ७५ किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केली आहे याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर आफूची शेती केल्याप्रकरणी अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआला   आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की खटाव तालुक्यातील  वाकळवाडी  येथील शिवारात सुमारे एक गुंट्या मध्ये अफूची लागवड केली असल्याची माहिती वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित ठिकाणावर कर्मचाऱ्यां सह छापा टाकला. या छाप्या दरम्यान वाकळवाडी शिवारात शांताराम रामचंद्र मोप्रेकर ,चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर,विमल पंढरीनाथ म्होप्रेकर सर्व राहणार वाकळवाडी यांनी स्व मालकीच्या शेतात त्यांच्या शेताच्या मधोमध गहू हरभरा कांदा पिकाच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले मानवी शरीरास अपायकारक असणारे गुंगीकारक अफूची लागवड करून त्याचे आर्थिक हिता करता संवर्धन व जोपासना केल्याचे दिसून आले.
          सदर पिक लागवडीनंतर सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचे ओलसर हिरवीगार पान त्यांना पांढरे फुले व हिरवे गोलाकार बोंडे असलेली पान फुलांचे तयार झालेल्या सात गोण्या त्याचे वजन ७५ की ग्रा त्याची किंमत एक लाख ५२ हजार ७०० असा माल वडूज पोलिसांना आढळून आला. औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार वडूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचा मार्गदर्शनाखाली स पो नि मालोजीराव देशमुख,पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर, दादा देवकुळे,संदीप शेडगे, दर्याबा नरळे, दीपक देवकर,भूषण माने,शिवाजी खाडे, सागर बदडे, मेघा जगताप, वृषाली काटकर यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी दिली असून अधिक तपास अधिक तपास  सपोनि मालोज राव देशमुख करत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!