मुस्लिम बांधवातर्फे महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात केळी वाटप ; हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन;
व्हिजन२४ तास न्यूज
By ; Ahmad Mulla
म्हसवड
म्हसवड शहर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारे शहर आहे येथिल सर्व मुस्लिम बांधव हे हिंदू बांधवाच्या प्रत्येक सन उत्सवात हिरीरीने भाग घेऊन हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत आले आहेत येथील गोल्डन गणेश मंडळ तर हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिकच मानले जाते या मंडळाचे अध्यक्षपद हे मुस्लिम समाजाकडे आहे गेली अनेक वर्षे मुस्लिम बांधव हिंदु बाधवाच्या बरोबर गणपतीची प्रतिष्ठापणा करत आले आहे सर्व सण, उत्सवात मुस्लिम समाज आनंदाने सामिल होत आले आहेत एकमेकांच्या घरी जाऊन गळा भेट घेऊन शुभेच्छा देतात त्याचेच दर्शन घडवत आज राष्ट्रीय कॉंग्रेसचे माण तालुकाअल्पसंख्याक चे अध्यक्ष गब्बारभाई काझी यांनी महा शिवराञी च्या निमित्ताने म्हसवङ येथील विर्श्वेश्वर कोटलिंग ( कोटातील ) महादेव मंदीर येथे मुस्लीम समाजातर्फे महाशिवराञी च्या निमित्ताने सर्व बाधवाना शुभेच्छा देऊन सर्वा़ना व केळी वाटप करण्यात आले त्या वेळी गब्बारभाई काझी, आरिफ तांबोळी ,सचिन शांताराम माने ,संभाजी राजेमाने, लाला तांबोळी, खंङेराव ताबवे, रियाज काझी हे उपस्थित होते