*गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द मध्ये आर. एस. पी. बाल सैनिक मेळावा उत्साहात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज 
By :सादिक शेख 
गोंदवले खुर्द :
                महाराष्ट्र राज्य वहातुक सुरक्षा दल वतीने शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द-ता. माण येथे आर. एस. पी. बाल सैनिक मेळावा उत्साहात आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला
           . सातारा पोलीस स्टेशन सातारा येथील निवृत्त इंस्ट्रक्टर मार्गदर्शक ए. एस. आय. मा.श्री.माणिकराव नलवडे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.वाहतुकीचे नियम समजावून सांगितले, संचलन प्रात्यक्षिक सराव करून घेतला, सिग्नल पिटी प्रात्यक्षिक करून घेतले, स्यालुट प्रकार प्रात्यक्षिक करून घेतले, पोलिस भरती झाल्यानंतर पोलिसांना ज्या प्रकारे ट्रेनिंग दिले जाते त्या प्रकारचे प्रात्यक्षिक सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या मेळाव्यास वर्दीतील दिलदार माणूस दहिवडी पोलिस स्टेशन दहिवडी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे   प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्याच दिवशी  वडुज मध्ये SP साहेबांचे इन्स्पेक्शन होते तसेच शिखर शिंगणापूर येथे गेले 4 दिवस महादेवांचा अभिषेक सोहळा सुरू आहे त्याच दिवशी शिखर शिंगणापूर येथे . भिडे गुरुजी पण आले होते साहेबांनी उत्तम बंदोबस्त ठेवलेला होता.  एवढ्या सगळ्या धावपळीतून  अक्षय सोनवणे   आर. एस. पी. बाल सैनिक मेळाव्यास उपस्थित राहिले. मा. मुख्याध्यापकांनी  सोनवणे  आभार मानून धन्यवाद दिले.आर. एस. पी. संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले कोल्हापूर विभागीय समादेशक श्री उमेश देशमुख सर , कोल्हापूर विभागीय समादेशक श्री. सूर्यवंशी सर, पुणे विभागीय समादेशक श्री. गायकवाड सर सातारा जिल्हा समादेशक मा.श्री.साळुंखे सर सातारा जिल्हा सहायक समादेशक मा. श्री. रवींद्र यादव सर तसेच मार्गदर्शक मा. श्री. माणिकराव नलवडे ( बापू ) ASI यांना विद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद! खूप खूप शुभेच्छा! देण्यात आल्या.विद्यालयातील आर. एस. पी. शिक्षक तसेच आर. एस. पी. माण तालुका समादेशक श्री. सादिक शेख सर यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळावा अतिशय उत्साहात,आनंदात,खेळीमेळी च्या वातावरणात पार पडला.विद्यार्थ्यांना पोलिस  खात्या मधील प्रात्यक्षिक नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. मेळावा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील  मुख्याध्यापक .टकले एम. डी. सर,. उगलमोगले सर,  साळुंखे सर, घोडके सर, .माने सर,श्री जाधव सर , .घाटगे अण्णा, विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे सहकार्य लाभले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!